श्रीलंका क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. उभयसंघात पावसामुळे 47 षटकांचा सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने करो या मरो सामन्यात श्रीलंकेसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 7 विकेट्स गमावून 46 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. श्रीलंकेने या सामन्यासह मालिकाही जिंकली. श्रीलंकेने या मालिकेत सलग दुसऱ्या विजयासह 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 19 नोव्हेंबरला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, कामिंडू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, जेफ्री वांडरसे, महेश तीक्षणा आणि अशिथा फर्नांडो.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, इश सोधी आणि जेकब डफी.