म्हादई नदीत बेकायदेशीर रेती उत्खनन करत असताना एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू. सुवर्णा दामोदर गावकर असे मृत महिलेचे नाव.
पारंपारिक लग्न सोहळा, सत्तरीतील 'ह्या' दोघांनी दिला मोठा सामाजीक संदेशसत्तरी तालुक्यातील दोन युवा पर्यावरणवादी विठ्ठल शेळके आणि वनिता वरक यांनी आधुनिक गोष्टींना फाटा देत पारंपारीक लग्न केले. वडाच्या झाडाखाली धनगरी वेषात लग्न सोहळा पार पडला . विठ्ठल आणि वनिता पर्यावरण अभ्यासक, कार्यकर्ते प्रा.राजेंद्र केरकरांचे शिष्य आहेत.
संस्कृती मापारीची जीसीए संघामध्ये निवड!संस्कृती निलेश मापारी (सकोर्डा, धारबांदोडा) हिची 15 वर्षांखालील गोवा क्रिकेट असोसिएशन संघामध्ये फलंदाज म्हणून निवड.
151 जयंती अगोदर गोव्यात बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला जावाबिरसा मुंडा रॅलीचा आज तिसरा दिवस आणि आज सावर्डे मतदार संघात ही रॅली पूजली आहे. बिरसा मुंडांची वेशभूषा करून एका तरुण मुलाने सरकारकडे मागणी केली आहे की बिरसा मुंडा यांचा गोव्यात एकही पुतळा नसल्याने पुढच्या 151 जयंती अगोदर गोव्यात त्यांचा पुतळा उभारला जावा.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांची Job Scam वर रोखठोक प्रतिक्रिया"पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही प्रमाणपत्र देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."
चोडण लोकवस्तीजवळ भयंकर मगरीला पकडलेलोकवस्तीजवळ वन खाते आणि डिचोली अग्निशमन दलाने मगरीला पकडले आहे. शनिवारी (दि.16 नोव्हेंबर) रोजी रात्री त्यांनी ही कामगिरी बजावली. काराभाट-चोडण येथे मगरीने कुत्र्याला फस्त केले होते.
आमदार जीत आरोलकरांच्या हस्ते केरीत कामांचा शुभारंभकेरी पंचायत क्षेत्रात विविध कामांचा आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.