Viral: इथे ओशाळली माणुसकी..सायरन, हॉर्न वाजवूनही रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही, कॅमेऱ्यात दृश्य कैद, नेटकऱ्यांची नितीन गडकरींना विनंती
ज्योती देवरे November 18, 2024 01:43 PM

Viral: जेव्हा एखाद्याचे प्राण वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा माणुसकीच्या नात्याने का होईना किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून इतरांची नक्कीच मदत केली पाहिजे. सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुमचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही, कारण सायरन, हॉर्न वाजवूनही रुग्णवाहिकेला एका कारने जायला रस्ता दिला नाही, हा सर्व प्रकार रुग्णवाहिकेतील एका कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

केरळमधील सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा कार चालक लांबपर्यंत रस्ता अडवताना दिसत आहे. रुग्णवाहिका चालकाने वारंवार हॉर्न वाजवूनही ती व्यक्ती त्याला रस्ता देत नाही. यानंतर रुग्णवाहिकेतील एका मदतनीसने घडलेल्या सर्व प्रकारचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळ पोलिसांनी कारवाई केली आहे.

सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद, नेमकं काय घडलं...

रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता, त्याला लवकर रुग्णालयात पोहोचायचे होते, त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालक बाजूलाच सतत सायरन वाजवत होता. जवळपास सर्व वाहने मार्गस्थ झाली होती, पण अतिहुशार एका कारचालकाने रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ताच दिला नाही. रुग्णवाहिकेला रस्ता न देणाऱ्या कार मालकाची कृती कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली. केरळमधील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कार रुग्णवाहिकेचा मार्ग अडवताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर कारवाई करण्यात आली. 

...अन् पोलिसांनी थेट कारचालकाचे घर गाठले

यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. कार मालकाचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी थेट त्याचे घर गाठले आणि दोन लाखांचा दंड ठोठावला. त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावर कारवाईबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

थेट नितीन गडकरींना विनंती

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की नितीन गडकरी जी तुम्ही कृपया खात्री करू शकता की, रस्ता सुरक्षा नियम आणि कायद्यांचा एक भाग म्हणून, रुग्णवाहिकांना रस्ता देणे ही एक महत्त्वाची बाब आहे, जे रस्ता देत नाहीत त्यांना शिक्षा आहे. काल मी अशाच एका घटनेचा साक्षीदार होतो, जेव्हा एका रुग्णवाहिका चालकाला जागा मागण्यासाठी हॉर्न वाजवावा लागला. दुसऱ्याने लिहिले की, अशा अनादरपूर्ण वागणुकीमुळे आपल्या काही देशवासियांमध्ये नागरी भावनांचा अभाव दिसून येतो. हे खरोखर लाजिरवाणे आहे - देव त्यांना मदत करो!

>>>

Viral: आई सर्वात मोठी योद्धा! लेकरासाठी एक 'आई' काय करू शकते, 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.