Fashion: साडी, दागिने, मेकअप, काहीही असो.. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांची फॅशनबाबत बातच वेगळी आहे..नीता यांच्या प्रत्येक गोष्टीची किंमत लाखों किंवा कोटींमध्ये असते. नीता अंबानी यांना फॅशनची खूप आवड असल्याने साडी, दागिने, पर्स, चप्पल, सगळंच लय भारी असतं. नुकत्याच मुंबईतील एका ब्युटी इव्हेंटमध्ये नीता अंबानी 'पॉपकॉर्न बॉक्स स्टाइल' बॅग घेऊन जाताना दिसल्या. जी आकाराने जरी लहान दिसत असली तरी त्याची किंमत जाणून तुम्हालाही धक्का बसेल..
मुंबईतील एका ब्युटी इव्हेंटमध्ये नीता अंबानी पॉपकॉर्न बॉक्स स्टाइल बॅग घेऊन जाताना दिसल्या. नीता अंबानीच्या लूकमधील खास आकर्षण होतं ते म्हणजे त्यांच्या हातातील पॉपकॉर्न बॅगचे... या बॅगेचा आकार जरी लहान असली तरी त्याची किंमत लहान नाही. कारण ती ब्रँडेड पॉपकॉर्न मिनॉडियर बॅग आहे. त्याची किंमत साधारण 24 लाख रुपये आहे. काळ्या आणि क्रीम रंगाची पॉपकॉर्न बॉक्स, जिच्यावर मण्यासारख्या कॉर्न कर्नलची रचना आहे, हे या बॅगचे वैशिष्ट्य आहे.
ही एक नामांकित ब्रँडेड फॅशन बॅग आहे. श्रीमंत लोक आणि सेलिब्रिटी अनेकदा अशी ब्रँडेड उत्पादने खरेदी करतात. त्यात नीता अंबानी आघाडीवर आहेत. नीता अंबानी यांच्याकडे जगातील जवळपास सर्व नामांकित ब्रँडची उत्पादने आहेत. या ब्रँडमध्ये अनेक मिनी आवृत्त्या उपलब्ध आहेत. मिनी व्हॅन सारख्या पिशव्यांसह अनेक खास डिझाईन्स उपलब्ध आहेत.
View this post on Instagram
या ब्युटी इव्हेंटमध्ये नीता अंबानीसोबत त्यांची मुलगी ईशा अंबानीही सहभागी झाली होती. ईशा अंबानी एक छोटी पर्स घेऊन आली होती. हा पर्स जुडिथ लीबर बॅग ब्रँडची आहे. या पर्समध्ये स्मार्टफोन ठेवणेही अवघड आहे. पण ही अतिशय बारीक आणि नाजूकपणे बनवलेली पर्स आहे. त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.
नीता अंबानी, ईशा अंबानी आणि अंबानी कुटुंबातील इतर सदस्य इतक्या महागड्या वस्तूंच्या मालकीण आहेत हे आश्चर्य नाही. कारण दररोज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या मुकेश अंबानी यांच्यासाठी ही काही मोठी रक्कम नाही. नीता अंबानी महागड्या वस्तू वापरतात तर मुकेश अंबानी थोडे वेगळे आहेत. मुकेश अंबानी हे अतिशय साधे व्यक्ती आहेत. ते दागिने किंवा इतर दिखाऊ वस्तू वापरत नाहीत. मुकेश अंबानी ब्रँडेड सूट घालतात, ज्याची किंमत लाखो आहे. पण ब्रँडेड कपडे, शूज आणि घड्याळे याशिवाय मुकेश अंबानी इतर गोष्टी कमी वापरतात.
>>>
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )