Versova Vidhan Sabha constituency: पश्चिम उपनगरातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वर्सोव्यातील यंदाची लढाई चुरशीची होण्याची शक्यता आहे. वर्सोवा (Versova Vidhan Sabha) हा मतदारसंघ 2008 साली अस्तित्त्वात आला. मराठी, मुस्लीम, गुजराती अशी संमिश्र लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ अलीकडच्या काळात भाजपचा (BJP) बालेकिल्ला गणला जातो. 2009 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे बलदेव खोसा विजय झाले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यातून विजय मिळवला होता.
यंदा वर्सोवा मतदारसंघातून यंदा भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना संधी दिली आहे. तर ठाकरे गटाने या मतदारसंघातून हरुन खान यांना उमेदवारी देत धाडसी डाव खेळला आहे. तर मनसेने याठिकाणी संदेश देसाई यांना रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि महायुतीमध्ये कशाप्रकारे व्होट ट्रान्सफर होते, या फॅक्टर्सवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असले. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार हरुन खान हेदेखील राजकीय चमत्कार करु शकतात. त्यामुळे आता वर्सोव्यात नक्की कोण जिंकून येणारे, याचे उत्तर 23 नोव्हेंबरला मिळेल.