अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ऋतुजा लटके की मुरजी पटेल, कोण मारणार बाजी?
जगदीश ढोले November 18, 2024 04:43 PM

Andheri East Vidhan Sabha Constituency Election 2024 Result : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. सध्या ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ राहिला असून आता शिवसेना शिंदे गटाकडून मुरजी पटेल (Murji Patel) आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्यामध्ये रंगत लढाई पाहायला मिळणार आहे. सध्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या आमदार ऋतुजा लटके या आहेत.

मागचे 2 टर्म अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा ठाकरे गटाचे दिवंगत नेते रमेश लटके (Ramesh Latke) यांच्याकडे होती. मात्र विद्यमान आमदार रमेश लटके यांचं 11 मे 2022 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. यानंतर लगेच पोटनिवडणूक झाली, ज्यात रमेश लटके यांच्या पत्नी  ऋतुजा लटके या ठाकरे गटाकडूनच उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी भाजप आणि शिंदे गटाने मुरजी पटेल यांना निवडणुकीत उभं केलं. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली आणि ऋतुजा लटकेंना आमदारकी मिळाली.

2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या रमेश लटके यांनी सलग दुसरा विजय मिळवला होता. रमेश लटकेंना 62,773 मतं मिळाली होतीत, दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना 45,808 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे अमिन कुट्टी यांना 27,951 मतं मिळाली होती. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.