Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात आजपासून थंडीचा जोर वाढणार! किमान तापमान 12 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता, IMD चा अंदाज
Times Now Marathi November 18, 2024 04:45 PM

: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अशात आज म्हणजे 18 नोव्हेंबरपासून थंडीचा जोर अजून वाढणार आहे. दरम्यान, तापमानाचा पारा 12 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात गारठा वाढत थंडीची लाट राहील. दरम्यान, मुंबईचा पारा देखील घसरण्याची शक्यता असून या ठिकाणी जोरदार थंडी जाणवेल. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, ठाण्यात तापमानाचा पारा 16 ते 17 अंश सेल्सिअस, पुण्यात 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

परतीचा पाऊस पुर्णपणे माघारी गेल्यानंतर राज्यातील तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे. या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उत्तरेकडील वारे सक्रिय होत वातावरणात गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणीचे तापमान 20 ते 21 अंशाच्या खाली आले आहे. त्यामुळं या भागात थंडी वाढली आहे आणि येत्या काळात या थंडीचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे.

पावसाचे सावट दूर

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात गेले दोन दिवस पावसाचे सावट होते. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता पावसाचे हे सावट दूर झाले आहे. अवकाळी पावसाचे सावट दूर होत तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. यंदा लांबलेल्या या परतीच्या पावसाने काही भागांतून पूर्ण माघार घेतली आहे. हवामानातील या बदलामुळे तापमानात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे अनेक भागात थंडीचा जोर वाढला आहे.


उत्तर महाराष्ट्रात थंडीचा लाट वाढली


राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट चांगलीच वाढली आहे. या ठिकाणी हळूहळू तापमानाचा जोर वाढत असून तापमानाचा पार 15 अंशाच्या खाली पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रात तर सुरुवातीपासूनच थंडीचा जोर बघायाला मिळाला. या ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसला आहे. येत्या काळात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांमध्ये देखील तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी आणि रात्री उशिरा हवेत गारवा जाणवत आहे. या ठिकाणी तापमानात कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.