हे अदानी कोणाचे? काँग्रेसच्या फोटोंना भाजपकडून फोटोने उत्तर, तावडे म्हणाले, एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है!
अभिषेक मुठाळ November 18, 2024 05:43 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर सडकून टीका केली. उद्योगपती गौतम अदानी यांना पुरक असणारे निर्णय घेतले जात आहे. अदानी यांचा फायदा व्हावा म्हणून धारावी प्रकल्प राबवण्यात येत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचे संगनमत आहे, असा आरोप केला. राहुल गांधी यांच आरोपांना आता भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी दाखवलेल्या फोटोंचे त्यांनी फोटोंनीच उत्तर दिलं आहे. 

विनोद तावडे यांनी दाखवले फोटो

विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. "गौतम अदानी यांचा जो विकास झाला, तो काँग्रेसच्याच काळात झाला. अदानी यांचा विकास देशात, परदेशात काँग्रेसच्याच काळात झाला. 2014 नंतरचे आणि 2014 सालच्या आधी अदानी यांना मिळालेल्या प्रकल्पांची एक यादी आहे. राजस्थान, कर्नाटक, पंजाब या राज्यांतील प्रकल्पांची ही यादी आहे. पंजाबमध्ये भटींडाचा प्रकल्प मिळाला. महाविकास आघाडीच्या काळात दिघी पोर्टचं काम मिळालं. भूपेश बघेल यांनी अदानी यांना माईन डेव्हलपर आणि ऑपरेटरचं काम छत्तीसगडमध्ये दिलं. अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये 10000 मेगावॅटचा प्रकल्प कसा उभा केला, अशोक गेहलोत यांनी जयपूरचं विमानतळ उभारलं," अशी यादी विनोद तावडे यांनी वाचून दाखवली.

तेव्हा अदानी कोणाचे होते?

"भाजपा, मोदी आणि अदानी हे नातं जोडलं जात आहे, ते खरं नाही. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. ज्यावेळी काँग्रेसने तेलंगाणामध्ये 12400 कोटी रुपयांचा करार करण्यात आला, तेव्हा हे अदानी कोणाचे होते. राजस्थानमध्ये 46 हजार कोटी रुपयांचा सोलार प्रोजेक्ट अदानी यांच्याबरोबर करण्यात आला. तेव्हा गेहलोत कोणाचे होते? अदानी कोणाचे होते," असा सवाल त्यांनी केला.

विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?

आज सकाळी राहुल गांधी यांची पीसी झाली. 8 नेते मंचावर होते, 2 राज्यातील आणि 6 बाहेरचे नेते होते. या पीसीमध्ये त्यांनी एक सेफ काढली, त्यातून फोटो काढले अदानी आणि मोदीजींचे हे फोटो होते. असे फोटो काढायचे तर अदानी आणि वाड्रा यांचेदेखील आहेत. हे फोटो गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना, शशी थरूर यांच्याबरोबर, तैलंगाणातील मुख्यमंत्री यांच्या बरोबर, हरियाणातील 2014 आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे असे अनेक फोटो आहेत. अदानी आणि काँग्रेसचं नातं कसं जुनं आहे, हे सांगू शकतो. 

एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है हे म्हणायचं का?

राजीव गांधींच्या काळात माझी ग्रोथ झाली असं अदानी स्वत:चं म्हणाले आहेत. अदानींचा सर्वात जास्त विकास झाला तो काँग्रेसच्या काळात. जे लोकं धारावीत राहतात त्या सर्वांना घरं मिळणार आहेत. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टी देखील मिळणार आहेत.  राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडीतच ठेवायचं आहे. शेख यांना ते कंत्राट मिळालं नाही म्हणून चिंता आहे का?  एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है हे म्हणायचं का? असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींचा 'पोस्टर हल्ला' तिजोरी खोलून भाजपावर केले मोठे हल्ले, नेमकं काय म्हणाले?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.