Sankashti Chaturthi 2024: हिंदू धर्मात चतुर्थीला खुप महत्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. चतुर्थी हा सण गौरीपुत्र भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी भगवा गणेशाची मनोभावे पूजा केल्यास आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. तसेच बाप्पाला प्रिय असलेले लाल फुल, मोदक अर्पण करावे. यंदा संकष्ट चतुर्थी 18 नोव्हेंबराला साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
योग्य तारिख18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे पूजा केल्यास प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
शुभ मुहूर्तपंचागानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल आणि 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी समाप्त होईल.
पुढील गोष्टी ठेवा लक्षातसंकष्टी चतुर्थीच्या दिवसी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर देवघल स्वच्छ केल्यानंतर भगवान गणेशाची मूर्ती स्थापित करावी. भगवान गणेशाची जलाभिषेक करून पिवळे चंदन लावावे. यानंतर लाल जास्वंदाचे फूल,दुर्वा आणि केळी अर्पण करावे. गणपती बाप्पाला मोदक आणि लाडू प्रिय आहे. शेवटी संकष्टी चतुर्थीची कथा वाचून श्रीगणेशाची आरती करावी. संध्याकाळी चंद्र पाहून त्याला जल अर्पण करून उपवास सोडावा. असे केल्याने जीवनातील मोठे अडथळे दूर होतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.