चांदिवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नसीम खान पराभवाचा वचपा काढणार की दिलीप लांडे पुन्हा जिंकणार?
जयदीप मेढे November 18, 2024 06:43 PM

Chandivali Vidhan Sabha constituency: चांदिवली विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघात (Chandivali Vidhan Sabha) शिवसेनेच्या दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी काँग्रेसच्या नसीम खान यांचा निसटता पराभव केला होता. त्यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघात नसीम खान विजयी झाले होते. त्यामुळे चांदिवली मतदारसंघ हा नसीम खान यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, 2019 मध्ये दिलीप लांडे यांनी त्यांना अवघ्या 409 मतांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नसीम खान हा हिशेब चुकता करणार का, हे पाहावे लागेल. यंदा दिलीप लांडे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या पाठिशी उद्धव ठाकरेंची ताकद नसल्याने त्यांना फटका बसणार का, हे पाहावे लागेल.

चांदिवली मतदारसंघात 4 लाख 46 हजार 767 मतदार आहेत. 2009 ते 2014 च्या काळात या मतदारसंघात मनसेची चांगली ताकद होती. 2014 च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने चांदिवलीत तब्बल 28 हजार मतं मिळवली होती. तर 2019 मध्ये मनसेच्या उमेदवाराला तब्बल 7 हजार मतं मिळाली होती. यंदा चांदिवलीतून मनसेने महेंद्र भानुशाल यांना रिंगणात उतरवले आहे. ते या निवडणुकीत किती मतं मिळवणार, यावर चांदिवली विधानसभेचा निकाल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.