Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?
esakal November 19, 2024 06:45 AM

Share Market Closing Latest Update 18 November 2024: शेअर बाजारात सोमवारी (18 नोव्हेंबर) निर्देशांक हिरव्या आणि लाल रंगामध्ये फिरताना दिसले. सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दाखवूनही, काही तासानंतर निर्देशांक मोठ्या घसरणीसह वरच्या स्तरावरून घसरले. सेन्सेक्स 900 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर निफ्टी देखील 150 हून अधिक अंकांनी घसरला होता आणि 23,400 च्या खाली आला.

सोमवारी (18 नोव्हेंबर) सलग सातव्या दिवशी बाजार लाल रंगात बंद झाले. निफ्टी 78 अंकांनी घसरला आणि 23,453 वर बंद झाला. सेन्सेक्स 241 अंकांनी घसरून 77,339 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 184 अंकांनी वाढून 50,363 वर बंद झाला.

Share Market Closing क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली तर आयटी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस, ऊर्जा, मीडिया आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. आजच्या व्यवहारादरम्यान, निफ्टी मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाले तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला.

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 29 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

वाढत्या टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एचयूएल, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स यांचा समावेश आहे. तर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि ॲक्सिस बँक घसरणीसह बंद झाले.

भारतीय शेअर बाजार का घसरला?

भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीत आयटी शेअर्सचा मोठा वाटा आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक एका वेळी 1200 हून अधिक अंकांनी घसरला होता आणि हा निर्देशांक 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

BSE SENSEX

Infosys, TCS, Tech Mahindra, Wipro आणि LTIMindtree आणि HCL Tech समवेत निफ्टी IT निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे की, सेंट्रल बँकेने व्याजदर कमी करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही.

त्यांच्या या विधानामुळे अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि त्याचा परिणाम भारतीय आयटी शेअर्सवरही झाला. खरे तर भारतीय आयटी कंपन्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा अमेरिकेतून येतो.

कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांव्यतिरिक्त, परदेशी केलेल्या विक्रीनेही बाजार खाली नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली एफआयआयची विक्री सुरूच आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.