मारहाण- परस्पर विरोधी फिर्याद
esakal November 19, 2024 10:45 AM

परस्परविरोधी
फिर्यादी दाखल
कोल्हापूर : रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातावेळी वादातून शिवीगाळ करून फरशीच्या तुकड्याने मारहाण करण्यात आली. याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. फजल सलीम मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गिरीष ऊर्फ अमोल विठ्ठल गावडे (वय ३१, रा. १३१८, सी वॉर्ड, हरिहर प्लाझा लक्ष्मीपुरी), गोट्या ऊर्फ चेतन राजू रणदिवे, स्वप्नील ऊर्फ बबलू वसंत ठोंबरे (३७, भोईगल्ली, रविवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच गिरीष ऊर्फ अमोल विठ्ठल गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फजल सलीम मुजावर (सी वॉर्ड, मटण मार्केटजवळ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.