Bollywood Actor Journey: बॉलिवूड (Bollywood) म्हणजे, एक मोहमाया आहे. या महाजालात अनेकजण अडकतात, काहीजण यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात, तर काहीजण गुरफटून जातात. यामध्ये केवळ सर्वसामान्यच नाहीतर, अनेक स्टारकिड्सही अडकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टारकीडबाबत सांगणार आहोत. सुपरस्टार जितेंद्र यांचा मुलगा आणि एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर (Tushar Kapoor) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. चित्रपटात आपलं करिअर घडवण्यासाठी दोघांनीही खूप मेहनत घेतली. मात्र, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसं यश मिळालं नाही. तुषार कपूरनं आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 19 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
तुषार कपूरनं 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून पदार्पण केलं. तुषारचा पदार्पणचा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत होती. चांगली सुरुवात करुनही तुषारच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. पहिल्या हिटनंतर मात्र, तुषारला म्हणावं तसं नाव कमावता आलं नाही. त्यानंतर त्यानं क्या दिल ने कहा, जीना सिरफ मेरे लिए, कुछ तो है, ये दिल यांसारखे अनेक चित्रपट केले. पण, सगळेच बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यानंतर आलेला खाकी, गायब हे चित्रपट काहीसे चालले. पण, बॉक्स ऑफिस गाजवू शकले नाहीत. त्यानंतर तुषारचे इंसान, Shart - The Challenge आले आणि कधी गेले कळालंच नाही.
View this post on Instagram
त्यानंतर क्या कूल हैं हम, गोलमाल हे दोन चित्रपट हिट ठरले. त्यानंतर त्याचे लव स्टोरी है, गुड बॉय बैड बॉय, Aggar, ढोल, संडे, वन टू थ्री, C Kkompany, लाईफ पार्टनर, शोर इन द सिटी, Love U...Mr. Kalakaar!, हम तुम शबाना, चार दिन की चांदनी, Bajatey Raho, क्या कूल हैं हम 3, मस्तीजादे यांसारखे चित्रपट आपटले. त्याचे तब्बल 19 चित्रपट फ्लॉप ठरले.
त्यानं गोलमाल सीरीजमध्येही काम केलं आहे. गोलमाल सीरिजमध्ये तुषारनं सायलंट कॅरेक्टर प्ले केलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल फ्रेंचायझी फारच हिट ठरली आणि तुषारच्या करिअरसाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरली. याशिवाय त्यानं लव सेक्स और धोखा 2 मध्येही कॅमिओ रोल प्ले केला होता. आता त्यांच्या हातात दोन फिल्म आहेत. ते दोघेही वेलकम टू जंगलमध्ये दिसून आले होते. त्याच्या हातात Kapkapiii नावाचाही एक चित्रपट आहे.