छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेला (Manoj Jarange Patil) जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत भाष्य करत लक्ष्य केले. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. तर दुसरीकडे कालीचरण महाराजांची टीकेनंतर मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे.
कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) या बाबांना एक तर आरक्षणावर बोलायची काही गरज नव्हती, संत म्हणताना त्यांना मानणाऱ्यातले आम्ही लोक आहोत. मात्र आरक्षण आणि बाबांचा संबंध काय येतो? बाबांनी आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे, हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाही, त्याचा शब्द आणि हातवारे बघता ते विष घेतल्यासारखा वागतात, त्याचे डोळे कसे तरी झाल्यासारखे दिसतात. तू बाबा विचित्र प्राणी आहे, तू कोणता बाबा आहे. हा तोच बाबा आहे ना, जो डोंगरावर उभा राहतो. असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
संजय शिरसाठ यांची भेट झाली. मात्र रोजच खूप मोठे लोक भेटीसाठी येत असतात. सध्या काय असतं तर राजकारण एक राजकारण असतं. त्यामुळे तेच काय सगळेच भेटीसाठी येत आहे, सगळ्या पक्षाच्या नेते येतात. मात्र मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाच आहे. सत्तेत कोणी आलं तरी मला आणि मराठा समाजाला लढावं लागणार आहे. म्हणून आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. असेही मनोज जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या