Maharashtra Assembly Election 2024 : वसई विरारमध्ये अभूतपूर्व राडा झाला असून बहुजन विकास आघाडीने भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं आहे. गेल्या अडीच तासांपासून हाॅटेल विवांतमध्ये हा अभूतपूर्व राडा सुरु आहे. दरम्यान, विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटी असल्याचा आरोप करण्यात येत आहे, तर त्यांच्या डायरीत 15 कोटींची नोंद असल्याचाही आरोप होत आहे. विनोद तावडे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात सापडल्यानंतर त्यांनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे.
भाजपचा खेळ खल्लास!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2024
जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले!
निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो! pic.twitter.com/BcGKRVSOkj
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, भाजप केवळ पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक आयोगाने जे काम करायला हवे होते ते काम जनता करत आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असे त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगावरील आमचा विश्वास तडा गेला आहे. आमच्या नेत्यांच्या बॅगा रात्रंदिवस तपासल्या पण काही सापडले नाही. तर भाजप नेते विनोद तावडे यांची बॅग तपासली नाही, ती कशी वाटली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या