Latest News : सोशल मीडियावर सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे. एका म्युझिक कंपनीच्या बॉसने रागाच्या भरात जवळपास 90% कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. "सकाळी झालेली ऑफिसची मिटींग ज्यांनी जॉईन केली नाही, त्यांना कामावरुन काढून टाकण्यात येत आहे" असं बॉसने म्हटलं आणि त्वरित सर्वांना टर्मिनेशन लेटर धाडलं. यूएस-आधारित कंपनीच्या बॉसने एकाच वेळी 99 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
ठरल्या प्रमाणे दिवसाच्या सुरुवातीला कंपनीच्या सीईओने मिटींग घेतली. या मिटींगमध्ये जवळपास 90% टक्के कर्मचारी गैरहजर होते. 110 पैकी केवळ 11 जणांनी मिटींग जॉईन केली होती, याच गोष्टीचा राग बॉसला आला. या मिटींगला गैरहजर राहण्याचं धाडस ज्या कर्मचाऱ्यांनी केलं त्यांना त्वरित नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. सकाळच्या मिटींगला उपस्थित न राहण्याची चांगलीच किंमत कर्मचाऱ्यांना मोजावी लागली.
चिडलेल्या सीईओने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना संदेश धाडले. तुम्ही कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि तुमच्यात कामाप्रती अजिबात गंभीरता नाही, असा संदेश धाडत रागवलेल्या बॉसने 99 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं.
रागवलेल्या बॉसनं म्हटलं, "तुम्ही मान्य केलेले कंपनीचे करार पूर्ण करण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात. कृपया कंपनीच्या मालकीचे सर्व साहित्य परत करा, सर्व खात्यांमधून साइन आउट करा आणि या ताबडतोब तुमचा राजीनामा सोपावा. मी तुम्हाला तुमचं जीवन अधिक चांगलं करण्याची संधी दिली आहे, पुढे कठोर परिश्रम करा आणि यशस्वी बना. तुम्ही कंपनीला गांभीर्याने घेत नाहीत, हे तुम्ही मला दाखवून दिलं आहे. आज सकाळी 110 लोकांपैकी फक्त 11 लोक मिटींगला उपस्थित होते. उपस्थित 11 सोडले तर बाकी सर्वांना नोकरीतून काढून टाकण्यात यंत आहे."
बॉसने पाठवलेल्या टर्मिनेशन लेटरचा स्क्रीनशॉट एका इंटर्नने सोशल मीडियावर पोस्ट केलं, यानंतर टीकेचीएकच झोत उठली आहे. या इंटर्नने म्हटलं की, नोकरीवर रुजू झाल्यानंतर तासाभरातच त्याला काढून टाकण्यात आलं.
हेही वाचा:
ज्योतिष : नवीन वर्ष २०२५ मध्ये बनतोय दुर्मिळ योग; 3 राशीनशीब सोन्यां उजळणार, नवीनसारसह अपार धनलाभ