कोमट पाणी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक समजले जाते. हे पचनसंस्था मजबूत करण्यासाठी सहायक ठरतात. आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतात. थंड पाण्याच्या तुलनेत कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया जलद होते. आणि शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. काही आहारतज्ज्ञांच्यानुसार, कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत पार पडते. ज्यामुळे वजन कमी करायला मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरते. आणि यामुळेच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर केली जाऊ शकते.
परंतु एका गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे ते म्हणजे केवळ कोमट पाणी पिणे लाभदायक नसते. काही विशेष स्थितींमध्ये कोमट पाणी पिणे नुकसानकारक ठरू शकते. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या व्यक्तींनी कोमट पाणी पिऊ नये आणि का याबद्दल.
– जाहिरात –
ज्या व्यक्तिंच्या तोंडात उष्णतेचे फोड येतात त्यांनी गरम पाणी पिण्यापासून स्वत:ला रोखले पाहिजे. फोडांवर गरम पाण्याचा थेट परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे वेदना अधिकच वाढू शकतात. आणि फोड लवकर बरे होत नाहीत. अशात थंड किंवा सामान्य तापमान असलेले पाणी प्यावे.
कोमट पाणी शरीरातून टॉक्सिक पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. मात्र अधिक प्रमाणात कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अधिक प्रमाणात असणारे पाणी आणि आवश्यक मिनरल्सदेखील निघून जातात. ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. ज्या लोकांना आधीपासूनच डिहायड्रेशनची समस्या आहे, त्यांनी कोमट पाणी पिण्यापासून वाचले पाहिजे. आणि सामान्य तापमान असलेले पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून शरीरातील पाण्याची मात्रा टिकून राहील.
– जाहिरात –
अॅसिडिटी असलेल्या लोकांनीही कोमट पाणी पिऊ नये. कारण यामुळे पोटातील अॅसिडचा स्तर वाढू शकतो. पोटात जळजळ, आंबट ढेकर आणि गॅस यासारख्या अनेक समस्या कोमट पाण्याने वाढू शकतात. अॅसिडिटीच्या लक्षणांना कमी करण्यासाठी थंड किंवा सामान्य पाणी पिणे चांगले असते.
पोटात अल्सर झाल्यावर कोमट पाणी पिणे किंवा गरम पाणी पिणे अल्सर वाढवू शकते. आणि वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरते. अल्सरच्या स्थितीमुळे पोटात आधीपासूनच वेदना सुरू असतात. गरम पाण्यामुळे त्रास वाढू शकतो. त्यामुळेच या स्थितीत थंड पाणी पिणे फायद्याचे ठरू शकते. जे पोटाला थंडावा आणि आरामही देऊ शकते.
ज्या लोकांना खूप ताप आहे अशांनीदेखील कोमट पाण्याचे सेवन टाळावे. तापामुळे शरीराचे तापमान आधीच अधिक असते. आणि या स्थितीमध्ये कोमट पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
कोमट पाणी नेहमी सामान्य प्रमाणात प्या. अत्याधिक गरम पाणी प्यायल्यामुळे गळा आणि पचनसंस्था यावर वाईट परिणाम पडतो.
कोमट पाण्याचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करणे फायदेशीर ठरते. परंतु आवश्यकतेनुसारच याचे सेवन करावे .
काही गंभीर मेडिकल स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे.
कोमट पाणी पिण्याचे अनेक लाभ जरी असले तरी हे पाणी पिताना दक्षता घेणं फार गरजेचं आहे.
हेही वाचा : Papaya Benefits : रिकाम्या पोटी पपई खाण्याचे हे आहेत फायदे
संपादन- तन्वी गुंडये