19 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर बाजार बंद मुंबई : शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सकाळपासून तेजीत असलेल्या सेन्सेक्समध्ये अखेरच्या तासात घसरण झाली. गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्यानं सेन्सेक्स 77578 अंकांवर बंद झाला. शेअर बाजार बंद होत असताना सेन्सेक्स 1 हजार अंकांच्या तर निफ्टी 300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. आज बाजार बंद झाला तेव्हा कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 240 अकांची वाढ पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 77,578 अंकांवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 अकांनी वाढून 23,518 अंकांवर बंद झाली.
आज शेअर बाजारातील बीएसईवरील सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 पैकी 23 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा 3.07 टक्के, टेक महिंद्रा 1.90 टक्के, एचडीएफसी बँक 1.82 टक्के, टायटन 1.58 टक्के, सन फार्मा 1.46 टक्के, टाटा मोटर्स 1.34 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.07 फीसदी, पॉवर ग्रीड 0.77 टक्के, इन्फोसिस 0.66 टक्के, अडानी पोर्ट्स 0.59 टक्के तेजी या कंपन्यांच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली.
बीएसईवरील सेन्सेक्समधील 13 कंपन्या तर निफ्टी 50 मधील 27 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. बीएसईवरील रिलायन्स 1.83 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 1.43 टक्के, बजाज फिनसर्व 1.21 टक्के, मारुती 1.20 टक्के, टाटा स्टील 1.17 टक्के, भारती एअरटेलच्या शेअरमध्ये 0.98 टक्के घसरण झाली.
आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मिडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थ केअर क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली. ऑईल अँड गॅस कमोडिटीज, ऊर्जा, मेटल्स, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आजच्या सत्रात निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 503 अंकांची तेजी पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 54548 अंकांनी तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 170 अंकांची तेजी पाहायला मिळाली.
शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली. बीएसईवर लिस्ट असलेल्या स्टॉक्सची मार्केट कॅप 430.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. कालच्या तुलनेत 1.31 लाख कोटींची वाढ पाहायला मिळाली. काल बाजार बंद झाला तेव्हा मार्केट कॅप 429.08 लाख कोटी रुपये होती. आज शेअर बाजारात तेजी असल्यानं गुंतवणूकदारांना फायदा झाला.
इतर बातम्या :
चांदीला झळाळी येणार! प्रति किलो चांदी 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत जाणार, सध्या चांदीची दर काय?
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..