'या' कारणामुळे 'किंग' खान बाथरूममध्ये बसून रडायचा, शाहरुखचा मोठा खुलासा
जयदीप मेढे November 20, 2024 10:43 AM

Shah Rukh Khan Struggle Story : अभिनेता शाहरुख खान बॉलिवूड 'किंग' असला, तरी त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. शाहरुख खानने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अपयशानंतर हार न मानता पुन्हा ताकदीने उठून त्याने संकटाचा सामना केला आहे आणि त्याचा परिणाम आहे की, त्याने जगभरात नाव कमावलं आहे. शाहरुख खानचे केवळ चित्रपटच नाही तर त्याच्या आयुष्यानेही लाखो लोकांना प्रेरित केलं आहे. शाहरुख खानने त्याच्या आयुष्यातील कठीण काळातील आठवण सांगितली आहे. शाहरुखने ते क्षण आठवले जेव्हा त्याला फक्त अपयशाचा सामना करावा लागला होता. शाहरुखने सांगितलं की, त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही की, तो बाथरुममध्ये रडतो.

'या' कारणामुळे 'किंग' खान बाथरूममध्ये बसून रडतो

शाहरुख खान अनेकदा चाहत्यांना अपयश आणि संकटांचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. शाहरुख खान मंगळवारी दुबईतील ग्लोबल फ्रेट समिटमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने त्याला जीवनात अपयशाचा सामना कसा करावा लागला, ते सांगितलं. शाहरुखने नवीन कलाकारांसोबत करिअर संदर्भात संवाद साधला. यावेळी शाहरुख खानने खुलासा केला की, जेव्हा त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालत नाहीत, तेव्हा तो बाथरूममध्ये बसून रडतो.

शाहरुख खानने सांगितली संघर्षाच्या दिवसातील आठवण

शाहरुख खान म्हणाला, "जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल तेव्हा तुमचं प्रोडक्ट किंवा काम चुकीचं आहे,  असं समजू नका. हे शक्य आहे की, तुम्ही ज्या वातावरणात काम करत आहात ते तुम्हाला नीट समजलं नसेल. लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. मी ज्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्यामध्ये जर मी भावना जागृत करू शकत नाही, तर माझं प्रोडक्ट कितीही चांगलं असलं तरी ते काम करणार नाही."

"हे इतर कोणालाही माहीत नव्हतं"

शाहरुखने असेही सांगितले की, त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये तो स्वत:ला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचा. अभिनेता शाहरुख खान याने सांगितलं की, "मला याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. संघर्षाच्या दिवसांत मी स्वतःला कसं हाताळलं, हे फक्त मलाच माहीत आहे. मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो. माझ्या आयुष्यात मी कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहे, हे इतर कोणालाही माहीत नव्हतं".

Anupamaa : रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा'च्या अडचणीत वाढ! कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूचं प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचलं

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.