दीपिका रणवीरनं त्यांचा मुंबईचा आलिशान फ्लॅट भाड्यानं दिला , महिन्याला घेतायत एवढं भाडं..
जयदीप मेढे November 20, 2024 11:13 AM

Deepika Padukone Ranveer Singh:  बॉलिवूडचं लाडकं कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे सध्या लेकीच्या आगमनानं चांगलेच चर्चेत आहेत. दुसरीकडे सिंघम अगेनच्या यशाचा आनंदही ते साजरा करतायत. दरम्यान, मुंबईतील त्यांचं आलिशान अपार्टमेंट या दोघांनी भाड्यानं दिल्याचं सांगण्यात आलंय. रिअल इस्टेट कन्सलटन्ट स्वेअरच्या यार्डने एका निवेदनात याचा खुलासा केलाय. यात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंग याने मुंबईतील त्यांचे अपार्टमेंट दरमहा तब्बल ७ लाख रुपये भाड्याने दिले आहे.

महिन्याला ७ लाख रुपये भाडं घेणार दीपवीर!

मुंबईतील ब्यू मोंडे टॉवर्स को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीमधील हे अपार्टमेंट असून महिन्याला या अपार्टमेंटसाठी ७ लाख रुपयांचा भाडेकरारही दीपिका आणि रणवीरनं केलाय. हे अपार्टमेंट 3,245 चौरस फूट आणि 2,319.50 चौरस फूट एवढे आहे. शिवाय पार्किंगची जागाही यात आहे.

सिद्धीविनायक परिसरातील फ्लॅट दिला भाड्यानं

नोव्हेंबर २०२४ मध्ये नोंदणीकृत लीज करार करत ३६ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.मुंबईतील प्रभादेवी परिसरातील त्यांचे हे अपार्टमेंट आहे. हा परिसर सिद्धीविनायक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दादर बीच आणि हाय स्ट्रीट फिनिक्स यासारख्या लोकप्रीय जागा इथून जवळ आहेत.

दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची कॉमेडीयनने उडवली खिल्ली

स्टँड अप कॉमेडीयन समय रैना सध्या त्याचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे प्रचंड चर्चेत आहे. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोचा लेटेस्ट दहावा एपिसोड रिलीज झाला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या यूट्यूबवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या शोमधील क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही प्रेक्षकांकडून याचं कौतुक केलं जात आहे, तर काही प्रेक्षकांकडून या शोवर टीका करण्यात येत आहे. या शोमध्ये दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवण्यात आली आणि यावर न्यूरोलॉजिस्टसह इतर परीक्षक हसत होते. यावर आता नेटकऱ्यांनी कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे.

शोवर नेटकरी भडकले

त्यानंतर तिने नुकतीच आई झालेल्या दीपिका पदुकोणच्या नैराश्याचा उल्लेख केला. यावेळी बंटी म्हणाली, 'दीपिका पदुकोणही नुकतीच आई झाली आहे ना? मस्त. आता तिला माहित पडेल की, खरं डिप्रेशन काय असतं.' यानंतर बंटी बॅनर्जीच्या बोलण्यावर पॅनेलमधील न्यूरोलॉजिस्टसह उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान, हा विनोद असंवेदनशील असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी शो आणि त्यामधील सहभागी लोकांवर टीकेची झोड उठवली आहे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.