मीटिंगला दांडी मारणाऱ्या 99 कर्मचाऱ्यांना डच्चू
Marathi November 20, 2024 01:24 PM

अमेरिकेतील एका म्युझिक कंपनीच्या बॉसने रागाच्या भरात जवळपास 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले. सकाळी ऑफिसची मीटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसने त्वरित सर्वांना टर्मिनेशन लेटर धाडले. एकाचवेळी 99 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मीटिंगमध्ये 110 पैकी केवळ 11 जणांनी मीटिंग जॉईन केली होती. याच गोष्टीचा राग बॉसला आला. सकाळच्या मीटिंगला उपस्थित न राहण्याची चांगलीच किंमत कर्मचाऱ्यांना मोजावी लागली.

चिडलेल्या सीईओने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना संदेश धाडले. तुम्ही कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि तुमच्यात कामाप्रति अजिबात गंभीरता नाही, असा संदेश धाडत रागवलेल्या बॉसने कर्मचाऱ्यांना काढून टाकलं.  ‘तुम्ही मान्य केलेले कंपनीचे करार पूर्ण करण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात. कृपया कंपनीच्या मालकीचे सर्व साहित्य परत करा, सर्व खात्यांमधून साइन आऊट करा आणि या ताबडतोब तुमचा राजीनामा सोपवा. तुम्ही कंपनीला गांभीर्याने घेत नाहीत, हे तुम्ही मला दाखवून दिले. मीटिंगला जे  उपस्थित 11 सोडले तर बाकी सर्वांना नोकरीतून काढून टाकण्यात येत आहे.’ असे टर्मिनेशन लेटरमध्ये लिहिले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.