डोंबिवली विधानसभा मतदारसंघ : रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांच्यात काँटे की टक्कर
Dombivli Assembly Election 2024 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. डोंबिवली विधानसभेत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीने या मतदारसंघात भाजपला संधी देत रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिलं आहे.
मतदारसंघातील समस्या
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रामाभाऊ कापसे प्रशासकीय इमारतीसह विविध समस्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील असुरक्षित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) इमारतीचा पुनर्विकासाचा मुद्दाही मोठा आहे. यासोबत केडीएसमी मनपाकडून सर्व अत्यावश्यक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पाऊल उचलण्याची गरज आहे.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
- दीपेश म्हात्रे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- रवींद्र चव्हाण (भाजप)
डोंबिवली विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल
- किसान कथोरे (भाजप) - 1,74,068 मते (विजयी)
- प्रमोद हिंदूराव (राष्ट्रवादी काँग्रेस) - 38,028 मते
डोंबिवली विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल
- किसान कथोरे (भाजप) - 85,543 मते
- गोटीराम पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 59,313 मते
कसा आहे मतदारसंघ?
डोंबिवली हा पूर्वीपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 15 वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आपले बस्तान व्यवस्थितपणे बसवलं आहे. एवढेच नव्हे या आधारावर रवींद्र चव्हाण यांनी आपली राजकीय ताकद वाढवत नेत मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण यांचे नाव हे भाजप नेतृत्त्वाच्या मर्जीतील नेते म्हणून घेतले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातही आपली ताकद वाढवताना दिसत आहेत. परिणामी कल्याण-डोंबिवली पट्ट्यात रवींद्र चव्हाण यांचे मोठे प्रस्थ तयार झालं आहे.