छत्रपती संभाजीनगर : महाराष्टात आज 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडत आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत. तर काही मतदान केंद्रावरती गोंधळ झाल्याचं दिसून येत आहे, अनेक ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या जुंपल्याचं दिसून येत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (ठाकरे गटाच्या) कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोशल मिडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. उस्मानपुरा भागातील मतदान केंद्रावरती हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उबाठाच्या) कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे. उस्मानपुरा भागातील मतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे. संजय शिरसाट यांची ही कोणती पध्दत आहे बोलायची? खुलेआम धमक्या देत आहेत. यावरती कारवाई करणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला आहे.
संजय शितसाट यांचीही कोणती पद्धत बोलायची! या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन @ECISVEEP @CEO_Maharashtra आणि @DGPMaharashtra कारवाई करणार का? #MaharashtraElection2024 #महाराष्ट्र pic.twitter.com/Nz8tMc5TET
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 20, 2024
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बोट दाखवून इशारा करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला, असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर अरे वेड्यांनो...तुम्हीच दाखवता मतदान केल्याचं बोट दाखवा...मग मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवणार ना...दुसऱ्या बोटावर शाई लावली असती असती तर ते दाखवलं...असं म्हणत अजित पवारांनी मिडल फिंगरसह करंगळी दाखवली. शर्मिला पवारांच्या या आरोपामागे नेमकं कारण काय?, असा प्रश्नही अजित पवारांना विचारण्यात आला. यावर तुझेही केस गेलेत, माझेही गेलेत, तरी अजून यामागचे कारण समजले नाही, असं मिश्किल विधान अजित पवारांनी केले. यानंतर पत्रकारांमध्ये देखील एकच हशा पिकला.
शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या पक्षाने धमकावल्याचा आरोप केला आहे. शर्मिला पवार यांच्या आरोपानंतर अजित पवार यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली. सर्व माहिती घेऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
शर्मिला पवार यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमक्या दिलेल्या नाही. इतके वर्षे निवडणूक होतेय, तेव्हापासून असे आरोप झाले नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण राहतो. आमचे कार्यकर्ते असं करणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. शर्मिला ठाकरेंनी तक्रार केली असेल तर पोलीस याबाबत चौकशी करतील. कुठेही बोगस मतदान झालेलं नाही. मी देखील 50 कार्यकर्त्यांना सांगेल द्या, तक्रारी, पण त्याला काय अर्थ आहे. त्यामागे काहीतरी तथ्य असायला हवं, असं अजित पवार म्हणाले. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मतदान करा. पण सर्वांनी येऊन मतदान करावं, असं आवाहन देखील अजित पवारांनी केला आहे.