AR Rahman Divorce : प्रसिद्ध संगीतकार एआर रेहमान अन् पत्नी सायरा बानूचा झाला घटस्फोट, पोस्ट करून म्हणतो, आम्हाला आशा होती....
Mensxp November 20, 2024 04:45 PM

AR Rahman Divorce With Wife Saira Banu : 

ऑस्कर विनर संगीतकार एआर रेहमान यानं पत्नी बेगम सायरा बानोपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनं एआर रेहमानच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण रेहमान आणि सायरा बानो यांचा संसार तब्बल २९ वर्षे सुरळीत सुरू होता. मात्र आता एआर रेहमाननं सोशल मीडियावर पोस्ट करून हा  २९ वर्षाचा संसार संपत असल्याचं सांगितलं. 

याबाबत दोन्ही बाजूंच्या वकिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली होती. त्यानंतर रेहमानने प्रतिक्रिया देत माझ्या प्रायव्हसीची आदर केला जावा अशी विनंती केली आहे. 

हेही वाचा : Kalyug Actor Smilie Suri : जिया धडक धडक जाये म्हणणारी कलयुगमधली सोज्वळ, गर्ल नेक्स्ट डोअर अभिनेत्री गेली कुठं? महेश भट्ट मामा, मोहित सख्खा भाऊ तरी...

काय म्हणतो एआर रेहमान? 

एआर रेहमानने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तो या पोस्टमध्ये अत्यंत जड अंतःकरणाने मी माझी पत्नी बेगम सायरा बानो यांच्यापासून वेगळं होत असं लिहितो. तो म्हणाला की आम्हाला वाटलं होतं की आमचा संसार ३० वर्षे पूर्ण करेल मात्र असं होताना दिसत नाहीये. 

रेहमान लिहितो की, 'मला आशा होती की आम्ही आमच्या संसाराची ३० वर्षे पूर्ण करू, मात्र असं होताना दिसत नाहीये. सर्व गोष्टींचा एक अदृष्य अंत असतो. ह्रदयभंगाच्या वजनाने परमेश्वराचे सिंहासन देखील थरथरू शकतं. तरीसुद्धा या विखरण्यात देखील आम्हाला अर्थ शोधावा लागेल. जरी ह्रदयाचे तुकडे आपल्या जागी परत येणार नाहीत. मात्र मित्रांनो या कठिण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा सन्मान करा धन्यवाद!

हेही वाचा :  Badshah Birthday : बादशाहचं खरं नाव आहे खूपच लांब लचक, सध्या रॅपर भाऊ पाकिस्तानी अभिनेत्रीमुळं आहे चर्चेत

कुटुंबाच्या मर्जीने झाले होते लग्न 

एआर रेहमान आणि सायरा बानो यांचे लग्न कुटुंबियांच्या पसंतीनं झालं होतं. रेहमान हा आपलं वैयक्तिक आयुष्य हे खूप प्रायव्हेट ठेवत होता. दोघेही फार कमी एकत्र एका कार्यक्रमात दिसत होतो. तरीदेखील चाहत्यांना मात्र कधी रेहमान आणि त्याच्या पत्नीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असेल वाटलं नव्हतं. 

रेहमान आणि सायरा यांचे अरेंज मॅरेज होतं. त्यांनी १९९५ मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्याला तीन मुलं आहेत. रेहमानने एका मुलाखतीत सांगितलं की त्यांचे लग्न हे त्यांच्या आईने ठरवलं होतं. रेहमानने लग्नापूर्वी १९८९ मध्ये इस्लाम धर्म स्विकारला होता. त्यांनी आपलं नाव हे दिलीप कुमार पासून अल्लाह रख्खा रहमान असं ठेवलं होतं. 


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.