मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे, दुपारपासून मतदानाचा जोर वाढेल असे दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते मतदारांना घेऊन मतदान करण्यासाठी काम करताना दिसून येतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर,बुथ कार्यकर्त्यांवर मतदान (voting) वाढविण्याची जबाबदारी पक्षनेतृत्वाने दिल्याने, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. त्यानुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत गडचिरोली जिल्ह्याने बाजी मारली असून येथे सर्वाधिक 50.79 टक्के मतदान झालंय. त्यानंतर, हिंगोली जिल्ह्यात 35.97 टक्के मतदान झालं आहे. तर दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान नांदेड जिल्ह्यात 28.15 झाले असून त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 28. 35 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील बिग फाईट आणि लक्षवेधी लढती असलेल्या मतदारसंघात मुंबईतील दोन ठाकरे बंधुंच्या लढती आहेत. तर, कोकणातील दोन राणे बंधुंच्या लढती आणि बारामतीमधील अजित पवार व युगेंद्र पवार या काका पुतण्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासह, बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या लढतीकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे.
अहमदनगर - ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड - ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया - ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव - २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं