मतदान करतानाच हृदयविकाराचा धक्का, मतदाराचा जागीच मृत्यू, सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना 
राहुल तपासे, एबीपी माझा November 20, 2024 06:43 PM

Maharashtra Assembly Election 2024 satara : सातारा (satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) जागीच मृत्यू (dies) झाला आहे. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे.  शाम धायगुडे असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. 

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मोरवे गावाता एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुलं परिसारत हळहळ व्यक्त केली जातेय. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर असा मिळून वाई विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी नागरांकिचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तरुणांसह महिला वयोवृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावत आहे. मात्र, खंडाळा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळं सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलं जातंय. 

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात

आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. मुंबई शहरात फक्त 27.73 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तमतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. लोक हळूहळू मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गडतिरोली जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 50.89 टक्के मतदानाची नोदं झाली आहे. मतदानाच्या बाबतीत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यानं मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, यासंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बीडमध्ये मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. यादरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जातेय.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्याभरात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, गडचिरोली जिल्ह्याची सरसी, तर मुंबईची पिछाडी 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.