मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
अभिषेक मुठाळ November 20, 2024 06:43 PM

धारावी : डॉ. ज्योती गायकवाड (काँग्रेस) विरुद्ध राजेश खंदारे (शिवसेना)
सायन कोळीवाडा : गणेश यादव (काँग्रेस) विरुद्ध कॅप्टन तमीम सेल्वन (भाजप)
वडाळा : श्रद्धा जाधव (शिवसेना ठाकरे) विरुद्ध कालिदास कोळंबकर (भाजप)
माहीम : महेश सावंत (शिवसेना ठाकरे) विरुद्ध सदा सरवणकर (शिवसेना) विरुद्ध अमित ठाकरे (मनसे)
वरळी : आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे) विरुद्ध मिलिंद देवरा (शिवसेना) विरुद्ध संदीप देशपांडे (मनसे)
शिवडी : अजय चौधरी  (शिवसेना ठाकरे) विरुद्ध बाळा नांदगावकर (मनसे)
भायखळा : महेश जामसुतकर (शिवसेना ठाकरे) विरुद्ध यामिनी जाधाव (शिवसेना ) 
मलबार हिल : भैरुलाल चौधरी  (शिवसेना ठाकरे) विरुद्ध मंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी  : अमिन पटेल (काँग्रेस) विरुद्ध शायना एन.सी. 
कुलाबा : हिरा देवासी (काँग्रेस) विरुद्ध  राहुल नार्वेकर (भाजप)

मुंबईत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला 

मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभेचे 10 मतदारसंघ आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील दोघे अनुक्रमे वरळी आणि माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मनसेचे बाळा नांदगावकर रिंगणात आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगानं कुलाबा विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. आता निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना यश येणार का हे पाहावं लागेल. मुंबईत दुपारी तीन वाजेपर्यंत एकाही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नव्हती. 

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.