गडचिरोली जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण, अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग असल्यामुळं 3 वाजेपर्यंतच मतदान
रोमित तोंबर्लावार, एबीपी माझा November 20, 2024 06:43 PM

Maharashtra Assembly Election 2024 Gadchiroli : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly Election) मतदानाची प्रक्रिया संपली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) 7 ते 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया असली तरी गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोतून गडचिरोली जिल्ह्यात 7 ते 3 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडत असते.

गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 1:30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान? 

1) गडचिरोली विधानसभा :- 49:17 

2) आरमोरी विधानसभा :- 51:05  

3) अहेरी विधानसभा :- 52:84


राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Vidhansabha Election) 2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झालं आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले.

सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात

आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. मुंबई शहरात फक्त 27.73 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तमतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. लोक हळूहळू मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गडतिरोली जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 50.89 टक्के मतदानाची नोदं झाली आहे. मतदानाच्या बाबतीत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यानं मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, यासंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अनेक ठिकाणी मतदारांचा मतदानासाठी चांगली प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी मतदारांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया असल्यानं त्यानंतरतच खरी माहिती सर्वांसमोर येणार आहे. दरम्यान, काही भागातील लोकांनी मतदानावर बहिष्कार घातल्याची माहिती देखील मिळाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या भागाती आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या न सोडवल्यामुळं त्या ठिकाणच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.