Vinod Kambli sang a song at the unveiling of Ramakant Achrekar memorial rrp
Marathi December 04, 2024 01:26 AM


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह असंख्य क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं आज दादर येथील शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. यावेळी भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांना बोलण्यास संधी देण्यात आली, मात्र त्यांनी भाषण करण्याऐवजी गाणे म्हटले.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह असंख्य क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं आज दादर येथील शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित होते. यावेळी विनोद कांबळी यांना बोलण्यास संधी देण्यात आली, मात्र त्यांनी भाषण करण्याऐवजी गाणे म्हटले. (Vinod Kambli sang a song at the unveiling of Ramakant Achrekar memorial)

सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह शेकडो खेळाडूंना रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचे धडे दिले आहेत. आजही शेकडो खेळाडू या मैदानावर येऊन मोठा खेळाडू होण्याचं स्वप्न पाहत असतात. त्या सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतूने दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ एक खास प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीमध्ये बॅट, स्टंप, हेल्मेट अशा गोष्टींचा समावेश आहे. राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी इथे हजारो लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमले होते.

– Advertisement –

हेही वाचा – Raj Thackeray : आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर…; आचरेकरांच्या स्मृतीस्थळी काय म्हणाले ठाकरे?

राज ठाकरे यांनी सुरुवातीला भाषण केल्यानंतर कार्यक्रमात मंचावर उपस्थित सर्व माजी खेळाडूंना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. यावेळी विनोद कांबळी यांनाही बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी म्हटले की, मला नक्कीच आचरेकर सरांची खूप आठवण येत आहे. मी आता काय बोलू? खरं तर मला फक्त एक गाणं म्हणायचंय. शॉर्टकटमध्ये सरांचं गाणं म्हणतो, असे म्हणत विनोद कांबळी यांनी ‘सरजो मेरा टकराय…’, हे गाणे म्हटलं. तसेच लव यु सर म्हणत विनोद कांबळी यांनी आपले भाषण संपवले.

– Advertisement –

कार्यक्रमात सचिन तेंडूलकर काय म्हणाले?

दरम्यान, स्मृती स्मारकाच्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, आचरेकर सरांच्या ग्राऊंडवर नेहमी प्राक्टिस मॅच असायची. कारण त्यांच्या मार्गदर्शनासाठी नेहमी क्रिकेट चालू असायचं. सरांनी मला नेहमी पाहिजे ती मदत केली. आम्हाला किट देखील दिली. महत्त्वाचे म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीची किंमत करायला शिकवली. सरांनी आम्हाला स्मार्ट प्लेयर म्हणून तयार केलं. नकळत त्यांनी खूप काही गोष्टी शिकवल्या. किटवर तुम्ही राग काढू नका, त्याची रिस्पेक्ट करा, असं त्यांनी आम्हाला नेहमी सांगितलं. मात्र सरांनी माझं वेल प्लेड म्हणून कधी कौतूक केलं नाही. कारण त्यांची कौतूक करण्याची पद्धत वेगळी होती, अशी आठवण सचिन तेंडुलकर यांनी सांगितली.

हेही वाचा – Syed Mushtaq Ali Trophy : सूर्यकुमार आणि शिवम दुबे चमकले; मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.