गेल्या 24 तासांपासून अजित पवार राजधानी दिल्लीतच, आज अमित शाह यांची भेट होण्याची शक्यता
Marathi December 04, 2024 02:26 AM

अजित पवार : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं महायुती पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. महायुती सरकारचा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार आहे. अद्याप नावाची घोषणा झाली नसली तरी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांची शिवसेना यांच्या खातेवाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळतेय. अर्थमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रही असतानाच, एकनाथ शिंदेंनी देखील अर्थमंत्रीपदावर (Finance Minister) दावा केलाय. अशातच अजित पवार गेल्या 24 तासांपासून राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत तळ ठोकून बसले आहेत. अद्याप भेट झालेली नाही.

अर्थ मंत्रालयाचा तिढा सुटणार का?

दरम्यान, आज अर्थ मंत्रालयाचा तिढा सुटणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित पवार हे अर्थमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. यावर एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे. खातेवाटपात अर्थ मंत्रालय आपल्याकडे राहावे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. अजित पवार काल सोमवारी रात्री राजधानी दिल्ली इथं 8 वाजता दाखल झाले आहेत. अजुनही अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत भेट झाली नाही. आज रात्री भेट होणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांना आगामी मंत्रीमंडळ स्थापने संदर्भात अमित शहा यांची भेट घ्यायची आहे.

अजित पवारांच्या मागण्या आअमित शाह मान्य करणार का?

अजित पवार हे काल दिल्लीत दाखल झाले आहे. मात्र, आज दिवसभरात त्यांची अमित शाह यांची भेट झालेली नाही.  त्यामुळं आजची रात्रही अजित पवार यांना दिल्लीतच काढावी लागणार आहे. अजित पवार उद्या सकाळी मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत. दरम्यान अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवारांची दुसरी रात्र दिल्लीतच जाणार आहे.  महायुती सरकारचा शपथविधी जवळ येऊन ठेपलेला असताना अजित पवार आपल्या मागण्या घेऊन दिल्लीत वेटिंगवर आहेत. अजित पवारांच्या मागण्या भाजपचे वरिष्ठ नेते मान्य करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. आज रात्री उशीरा अमित शाह यांची भेट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

Vinod Tawde: महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा अन् भाजपचा मोठा निर्णय; विनोद तावडेंचं ‘राजकीय वजन’ आणखी वाढणार!

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.