नववर्षानिमित्त मुंबई जवळ फिरण्यासाठी ‘ही’ आहेत उत्तम ठिकाणे
GH News December 19, 2024 05:15 PM

2025 हे नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आपण प्रत्येकजण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात नववर्षाचे स्वागत करतो. तर काहीजण नववर्षाचे औचित्य साधून कुटुंबीय किंवा मित्रांसोबत पार्टीला जातात, तर काहीजण बाहेर फिरण्याचा बेत आखतात. बहुतेक लोकं हिल स्टेशन किंवा समुद्र किनाऱ्यासारख्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करतात. विशेषत: जे दिल्लीत राहतात ते बहुतेकजण हिमाचल आणि उत्तराखंडला फिरायला जातात. पण जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर नवीन वर्षाच्या सुट्टीत तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता. कोणते आहेत ही ठिकाणं चला जाणून घेऊयात.

अलिबाग

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही मुंबईच्या आसपास असलेले सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे अलिबाग आहे. अलिबाग हे ठिकण खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. सुंदर वाळूच्या किनाऱ्यांनी वेढलेला हा किनारी भाग असून तुम्ही येथे फॅमिलीसोबत तसेच मित्रांसोबत येऊन अलिबाग बीचवर फिरायला जाऊ शकता. याशिवाय अलिबाग मध्ये आल्यावर तुम्ही फक्त अलिबाग बीचच नाही तर इथे असलेले वरसोली बीच, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, उंधेरी किल्ला, किहीम बीच, कंकेश्वर फॉरेस्ट, मांडवा, काशिद बीच अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ छान मस्त मज्जा करून फिरू शकता. इथे तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे.

लोणावळा

मुंबईजवळ वसलेले लोणावळा हे ठिकाण फिरण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. लोळवण्यात फिरायला आल्यावर तुम्हाला येथील निसर्गसौंदर्य आकर्षित करते. घनदाट जंगलांच्या मधोमध वसलेले तलाव आणि सुंदर धबधबे हिरवेगार डोंगर यांचे नैसर्गिक दृश्य अतिशय सुंदर पाहायला मिळते. रोजच्या धकाधकीपासून दूर असलेल्या ठिकाणी जायचं असेल तर लोणावळ्याला जाऊ शकता. येथे कार्ला लेणी, लोहागड किल्ला, बुशी धरण, ड्यूक्स नाक, पवना तलाव, राजमाची किल्ला, कुने धबधबा, तुंगारली तलाव, दरी खोरे अशी अनेक ठिकाणे पाहता येतात. विशेषतः जे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम ठरेल.

कर्जत

मुंबईपासून काही अंतरावर असलेले निसर्गसौंदर्याने नटलेले कर्जत शहर हे देखील अतिशय सुंदर प्रेक्षणीय ठिकाण आहे. गवताने आच्छादित दऱ्या आणि सुंदर लेणी ही अनेक सुंदर ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. येथे तुम्हाला हायकिंग आणि रिव्हर राफ्टिंग करण्याची ही संधी मिळू शकते. धबधबे आणि हिरव्यागार नैसर्गिक दृश्यांनी नटलेल्या उल्हास खोऱ्यात तसेच जास्त वर्दळ नसल्याने येथील शांतता प्रत्येक पर्यटकांना हवीशी वाटते त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकणी मुक्काम करतात . सोंडई किल्ल्यावर फिरण्याचा आनंद घ्या आणि येथील अनेक सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.