Kumbh Mela : 2025च्या कुंभमेळ्यात पहिल्यादांच नवीन तंत्रज्ञानाचा वापर..!
Sarkarnama December 31, 2024 12:45 AM
Kumbh Mela 2025 कुंभमेळा

13 जानेवारी 2025 पासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू होणारा कुंभमेळा 45 दिवसाचा असणार आहे. याची मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Kumbh Mela 2025 प्रयागराजचा संगम घाट

या कुंभमेळाव्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक, साधू प्रयागराजच्या संगम घाटावर स्नान करण्यासाठी येतात.

Narendra Modi नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये बोलताना म्हणाले, कुंभमेळा हा 2025 चा एकतेचा संदेश देणारा उत्सव असणार आहे. हा उत्सव म्हणजे एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे.

Kumbh Mela 2025 व्यवस्था

या मेळाव्यात येणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारच्या व्यवस्था राबवण्यात येणार आहेत.

Kumbh Mela 2025 'एआय चॅटबॉट'

महाकुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच 'एआय चॅटबॉट' चा वापर केला जाणार आहे. या डिजिटल नेव्हिगेशन सुविधेमुळे नागरिकांना ठिकाणे, विविध घाट, मंदिरे तसेच साधूच्या तंबूपर्यंत जाण्यास मदत होणार आहे. हा 'एआय चॅटबॉट' 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Kumbh Mela 2025 'टेथर्ड ड्रोन'

पाण्याखाली 100 मीटर आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीपर्यत लक्ष ठेवणाऱ्या 'टेथर्ड ड्रोन' चा वापार केला जाणार आहे. जो आकाशातून आणि पाण्याखाली हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेऊ शकणार आहे.

Kumbh Mela 2025 अयोध्येतील रामच्या मूर्तीचा अभिषेक

कुंभमेळ्याच्यानिमित्ताने अयोध्येमधील राम मंदिरातील रामच्या मूर्तीचा अभिषेक देखील यावेळी होणार आहे. येथे देखील 'टेथर्ड ड्रोन' चा वापर केला जाणार आहे.

Kumbh Mela 2025 रस्त्यांचे नूतनीकरण

कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशामधील 92 गावांच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणारं आहे. तर 30 पूलाचे देखील बांधणी होणार आहे. तसेच भारतातील जवळ- जवळ 80 भाषांमधील चिन्हेही येथे लावली जाणार आहेत .

NEXT : कसा बनवला जातो PAN नंबर; प्रत्येक अक्षराचा असतो वेगळा अर्थ; जाणून घ्या सिक्रेट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.