ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. टीम इंडियाच्या आर अश्विन आणि आकाशदीप या जोडीने 10 विकेट्ससाठी केलेली चिवट भागीदारी आणि पावसाच्या मदतीमुळे टीम इंडिया हा सामना बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर आता उभयसंघात 26 ते 30 डिसेंबर दरम्यान चौथा कसोटी सामना होणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे टेस्ट असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम मॅनजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया निवड समितीने चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पॅट कमिन्स हाच ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ हे दोघे उपकर्णधारपदाच्या भूमिकेत असणार आहेत. ऑस्ट्रेलियाने या अंतिम 2 सामन्यांसाठी 2 बदल केले आहेत.
ऑस्ट्रेलियाने एकाने या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर एकाला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. जोश हेझलवूड याला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्याच्या जागी झाय रिचर्डसन याला संधी देण्यात आली आहे. तर ओपनर नॅथन मॅकस्वीनी याच्या जागी सॅम कोनस्टास याचा समावेश करण्यात आला आहे. नॅथनला डच्चू देण्यात आल्याने चौथ्या आणि पाचव्या सामन्यात ओपनिंग जोडी बदलणार असल्याचं निश्चित झालं आहे.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
अंतिम 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.