मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात दुचाकीला धडक बसल्यानं बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालक फरार झाला असून, फरार चारचाकी चालकाचा शोध पोलीस करीत आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेनंतर धुळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यू कधी कुणाचा होईल सांगता येत नाही. सेंधवाजवळील बारदवारी गावात बहिणीचा मृत्यू झाला. बहिणीच्या अंत्यविधीसाठी दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासोबत जात होते. मात्र, बहिणीच्या अंत्यविधीला जाण्यापुर्वीच त्यांना कवटाळलं. दोघं ज्या दुचाकीवरून जात होते, त्याच दुचाकीला चारकाकीनं धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दगडू भावका बंजारा (५५) आणि रामचंद्र सदू बंजारा (४५) असे मयत दोघा भावांची नावं आहेत. शिरपूर तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असलेल्या बंजारा भावांची बहिण सेंधवाजवळील बारदवारी गावात तिचा मृत्यू झाला होता. बहिणीच्या अंत्यविधीला दुचाकीवरून जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
चारचाकीनं दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दोघांचाही दुर्देवी अंत झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीनं धडक दिल्यानंतर चालकानं तेथून पळ काढला. दरम्यान, फरार चारचाकी चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.