आयपीएलच्या 18 व्या मोसमाला अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. काही दिवसांआधी या हंगामासाठी मेगा ऑक्शन पार पडलं. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. त्यात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने मोठी घोषणा केली आहे. फ्रँचायजीने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानचा स्टार ऑलराउंडर राशिद खान हा अनेक टी 20 लीग स्पर्धांमध्ये खेळतो. राशिद आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स फ्रँचायजीकडून खेळतो. तसेच राशिद दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणाऱ्या साऊथ आफ्रिका (SA 20) लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायजीकडून खेळतो. राशिद या स्पर्धेत MI केप टाऊन या संघांचं प्रतिनिधित्व करतो. आता याच संघाकडून राशिदला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राशिदची साऊथ आफ्रिका 20 स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राशिद खान याला वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑलराउंडर किरॉन पोलार्ड याच्या जागी संधी देण्यात आली आहे. मुंबईला गेल्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नव्हती. टीममध्ये एकसेएक खेळाडू असूनही मुंबईला पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी रहावं लागलं होतं. मुंबईला 10 पैकी फक्त 3 सामन्यांतच विजय मिळवता आला होता.
राशिद खानने याआधी SA20 स्पर्धेतील पहिल्या हंगामातही मुंबईचं नेतृत्व केलं होतं. राशिदला सलामीच्या हंगामात आपल्या नेतृत्वात काही खास करता आलं नव्हतं. मुंबईला पहिल्या 2 हंगामात ट्रॉफी उंचावता आली नाही. तसेच राशिदला गेल्या हंगामात दुखापतीमुळे सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे आता राशिदकडून फ्रँचायजीला अनेक आशा आहे. राशिदने या स्पर्धेतील एकूण 10 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेण्यासह 52 धावा केल्या.
मुंबई फ्रँचायजीने या तिसऱ्या हंगामासाठी अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये इंग्लंडचा विस्फोटक ऑलराउंडर बेन स्टोक्स याचा समावेश आहे. तसेच ट्रेन्ट बोल्टही आहे. या तिसऱ्या हंगामाला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
राशिद खानची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती
SA20 2025 साठी मुंबई इंडियन्स केप टाउन टीम: राशिद खान (कॅप्टन), क्रिस बेंजामिन, डेवाल्ड ब्रेव्हीस, रयान रिकेलटन, रासी वॅन डेर डुसेन, कॉनर एस्टरहुइजन, डेलानो पोटगीटर, रीजा हेंड्रिक्स, कॉलिन इनग्राम, ट्रिस्टन लुस बेन स्टोक्स, अझमतुल्लाह उमरझई, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा, ट्रेन्ट बोल्ट, नुवान तुषारा आणि डेन पीड्ट.