भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे दोन्ही देशांच्या क्रीडारसिकांसाठी पर्वणी असते. हा सामना यु्द्धापेक्षा काही कमी नसतो. दोन्ही देशाचे सामना सुरु होण्याआधीपासूनच सोशल मीडियावर उणीधुणी काढत असतात. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही हायब्रिड मॉडेलवर होणार असल्याने भारत पाकिस्तान सामना कधी असेल याची उत्सुकता लागून आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रारूप आराखडा आयसीसीकडे पाठवला होता. त्यात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून सामना 1 मार्चला होईल असं सांगण्यात आलं होतं. पण आता यात बदल झाला आहे. हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा होणार असल्याने भारताचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होमआर आहे. हे सामने कोलोंबो किंवा दुबईत होण्याची शक्यता आहे. असं असताना भारत पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे असी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जवळपास या तारखेवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.
‘भारताची 23 फेब्रुवारी 2025 रोजी तटस्थ ठिकाणी पाकिस्तानशी लढत होईल. आयसीसी त्यांचे सामने आयोजित करण्यासाठी कोलंबो आणि दुबईकडे पाहत आहे,’ असं सूत्रांनी गुरुवारी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमधील तीन स्टेडियममध्ये होणार आहे. रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे हे सामने होतील. तर हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळेल. भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय सामने खेळत नाहीत. दोन्ही संघ शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-2013 मध्ये खेळले होते. भारत-पाकिस्तान सामने आता फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये होतात.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पात्र ठरले आहेत. प्रत्येकी चार संघांचं दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.