Old Delhi famous recipe : आता घरीच बनवा मटण निहारी
Webdunia Marathi December 20, 2024 09:45 PM

साहित्य-

मटण - 750 ग्रॅम

तेल - एक टीस्पून

तूप - तीन चमचे

तळलेला कांदा - अर्धा कप

मोठी वेलची - दोन

लसूण आले पेस्ट - दोन चमचे

वेलची - तीन

हिरवी मिरची - तीन

चवीनुसार मीठ

हळद - अर्धा टीस्पून

मीट मसाला - एक टीस्पून

सुंठ पूड – अर्धा टीस्पून

बडीशेप पूड - अर्धा टीस्पून

पीठ- दोन चमचे

हिरवी वेलची - अर्धा टीस्पून

लिंबू - एक

कोथिंबीर - एक टीस्पून

कृती-

सर्वात आधी मटण स्वच्छ धुवून एका भांड्यात ठेवावे. नंतर गॅसवर पॅन ठेवावा आणि त्यात तूप घालून गरम करावे. तसेच आता दुसर्या पॅनमध्ये 3 कप पाणी घालावे. आता गरम तुपात मटणाचे तुकडे टाकून तळून घ्यावे.चांगले शिजवून घ्यावे आणि नंतर मीठ, तिखट, मटण मसाला आणि इतर साहित्य घालून चांगले शिजवावे. आता कढईत पीठ घालावे आणि ते हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. आता मटण ग्रेव्हीच्या वर तरंगणारे थोडे तेल काढून टाका आणि पॅन पुन्हा शिजण्यासाठी ठेवा. आता गव्हाच्या पिठाचे मिश्रण ग्रेव्हीमध्ये थोडे-थोडे घालावे. नंतर तळलेले कांदे आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. गॅस बंद करावा आणि सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा. नंतर तळलेले कांदे, हिरवी मिरची, लिंबाचे तुकडे आणि कोथिंबीर गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली मटण निहारी रेसिपी.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.