लक्षाधीश: नवीन वर्ष 2025 सुरु होण्यास अवघा एका दिवसाची अवधी बाकी आहे. या नवीन वर्षात अनेकजण नवनीन योजना आखत असतात. मात्र, सर्वांच्याच योजना पूर्ण होतील असे नाही. पण तुम्ही जर नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करावं लागेल. अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तुम्ही जर योग्य वेळी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता.
तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. केलेली गुंतवणूक सुरक्षीत ठिकाणी आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये किती परतावा मिळतो? या दोन्ही गोष्टींचा विचार करुनच गुंतवणूक केली जाते. या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे, अनेकांचे ध्येय करोडपती बनणण्याचे असते. मात्र यासाठी गुंतवणुकीबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. आजच्या काळात करोडपती बनणे अवघड नाही. लहान रक्कम जोडून देखील तुम्ही तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करु शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्ही नवीन वर्षापासून म्हणजे 2025 पासून प्रत्येक महिन्याला 5000 रुपये वाचवले तर किती दिवसात तुम्ही करोडपती व्हाल. मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी दरमहा 5000 रुपयांची बचत करणे अवघड काम नाही. जर तुम्ही 2024 पर्यंत विचारात वेळ घालवला असेल, तर नवीन वर्षापासून या कामात सहभागी व्हा, काही वर्षांतच तुम्हाला हे समजेल की आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पैशाची गरज नाही तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. त्यामुळे नवीन वर्षापासून तुम्ही दरमहा 5000 रुपये जमा करून करोडपती होऊ शकता.
तुम्ही तुमचे ध्येय कसे गाठू शकता याचे संपूर्ण गणित समजावून घेऊ. यासाठी पैसे कुठे गुंतवायचे? आज म्युच्युअल फंडाबाबत सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात फक्त 5000 रुपये दरमहा SIP करू शकता, SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी केली आणि त्यावर तुम्हाला वार्षिक 15 टक्के परतावा मिळत असेल, तर तुम्ही 22 वर्षांनी करोडपती व्हाल. तुमच्याकडे एकूण 1.03 कोटी रुपये असतील. तर या 22 वर्षांत तुम्ही एकूण 13.20 लाख रुपये जमा कराल.
दुसरीकडे, जर वार्षिक परतावा 17 टक्के असेल, तर मासिक 5000 रुपये गुंतवून तुम्ही 20 वर्षांत म्युच्युअल फंडातून 1.01 कोटी रुपये गोळा करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही दरमहा 5000 रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्यात वार्षिक 10 टक्के वाढ केली, तर 12 टक्के वार्षिक परताव्यावरही 20 वर्षांनंतर तुमच्याकडे 1 कोटी रुपये होतील. याचा अर्थ, जर तुम्ही 2025 पासून दरमहा 5000 रुपये SIP करत असाल तर 2045 मध्ये तुम्ही 1 कोटी रुपयांचे मालक व्हाल.
जर तुम्ही मासिक 5000 रुपयांची एसआयपी केली आणि वार्षिक 10 टक्के गुंतवणूक वाढवली, तर 20 वर्षांनंतर, 15 टक्के रिटर्नवर तुम्हाला एकूण 1,39,18,156 रुपये मिळतील. तर या कालावधीत तुम्ही एकूण 34,36,500 रुपयांची गुंतवणूक कराल. हे केवळ 5000 रुपये प्रति महिना मोजले गेले आहे, जे दरमहा किमान 25,000 ते 30,000 रुपये कमावणारे लोक करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम दुप्पट केली तर साहजिकच परतावाही दुप्पट होईल.
अधिक पाहा..