जर्मनीच्या मॅगडेबर्ग शहरात भीषण हल्ला झाला आहे. एक वेगात आलेली कार नागरिकांची प्रचंड गर्दी असलेल्या बाजारात घुसली. या कारने अक्षरक्ष: लोकांना चिरडलं. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. नाताळ निमित्त ही बाजारपेठ सजली होती. नाताळ सणाला आता चार दिवस उरले आहेत. म्हणून जर्मनीच्या मॅगडेबर्ग शहरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यावेळी ही घटना घडली. जर्मन पोलिसांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तो सौदी अरेबियाचा राहणारा आहे.
क्षेत्रीय प्रमुख रेनर हसेलॉफ यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, “कार चालक सौदी अरेबियाचा रहिवाशी आहे. त्याचं वय 50 वर्ष असून पेशाने तो डॉक्टर आहे. पूर्वेकडच राज्य सेक्सोनी-एनहाल्टमध्ये तो राहतो” आम्ही गुन्हेगाराला अटक केली असून हा डॉक्टर 2006 पासून जर्मनीमध्ये वास्तव्याला आहे असं रेनर हसेलॉफ यांनी सांगितलं.
कसा झाला हल्ला?
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 च्या नंतर बाजार गर्दीने भरलेला होता. त्यावेळी एक काळ्या रंगाची BMW कार प्रचंड वेगात या गर्दीमध्ये घुसली असं परदेशी मीडियाने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. “सौदीचा हा माणूस म्यूनिखची लायसन्स प्लेट असलेली भाड्याची कार घेऊन ख्रिसमस मार्केटमध्ये आला होता” अशी माहिती रेनर हसेलॉफ यांनी दिली.
(बातमी अपडेट होत आहे)