विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यत आहे. तसे संकेत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी पुण्यात दिले आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, असा शिवसैनिकांचा आग्रह सुरू आहे. मुंबईत आम्हाला लढावं लागेल. प्रमुख कार्यकर्ते, नेते यांची भावना ही मानसिकता आहे. मी मुंबईपुरते बोलत आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीसाठी आले होते. तेव्हा, प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
– Advertisement –
हेही वाचा : फडणवीसांचा ‘तो’ गौप्यस्फोट अन् संजय राऊत भडकले; म्हणाले,”तुम्ही कोण आहात?”
संजय राऊत म्हणाले, “मुंबई महापालिकेत शिवसेना हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. एवढ्या कठीण परिस्थितीही आम्ही विधानसभेला 10 जागा जिंकल्या आहेत. चार जागा आम्ही फार कमी मताने पराभूत झालो आहोत. मुंबई महापालिकेत आम्हाला सत्ता मिळवावी लागेल. अन्यथा मुंबई वेगळी होईल. मराठी माणसांवर ज्याप्रकारे हल्ले सुरू आहेत, हे सगळेजण पाहत आहेत.”
– Advertisement –
“मुंबई महापालिकेसंदर्भात उद्धव ठाकरे आणि आमच्यात चर्चा सुरू आहे. स्वबळावर निवडणूक लढवावी, असा शिवसैनिकांचा आग्रह सुरू आहे. मुंबईत शिवसेनेची निर्विवाद ताकद आहे. मुंबईत आमच्या वाट्याला आणखी काही जागा आल्या असत्या, तर आम्ही जिंकलो असतो. मुंबईत आम्हाला लढावं लागेल. प्रमुख कार्यकर्ते, नेते यांची भावना ही मानसिकता आहे. मी मुंबईपुरते बोलत आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही,” असं राऊत यांनी स्पष्ट केले.
“भाजपसोबत असताना आम्हा महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढलो आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकमध्ये महाविकास आघाडी आहेच. पण, मुंबईचं महत्त्व देशात आणि महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळं आहे. तिथे शिवसेनेची ताकद नसेल, तर उद्या तुकडे पडण्याची शक्यता आहे,” अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : अधिवेशनचा शेवटचा दिवस अन् महायुतीकडून मोठी घोषणा शक्यता?