देवेंद्र फडणवीसांचा सावध पवित्रा; खातेवाटप कुठे रखडलंय?, महायुतीचं ‘राजकीय गणित’ आलं समोर
Marathi December 21, 2024 11:24 AM

Maharashtra Cabinet: मंत्र्यांनी शपथ घेऊन सात दिवस झाले. हिवाळी अधिवेशनही संपत आले. पण खातेवाटप कुठे रखडलंय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मंत्रिमंडळातून अनेकांचा पत्ता कापल्याने, महायुतीच्या तिन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. ऐन अधिवेशनात खातेवाटप झाल्यास ही नाराजी आणखी वाढू शकते, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साधव पवित्रा घेतल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीचं ‘राजकीय गणित’-

अधिवेशन संपल्यावर 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री, खातेवाटपाचं पत्र राजभवनला पाठवतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील, असं सांगण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही, असं त्यामागचं गणित असल्याचं म्हटलं जात आहे.

खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात?

महायुतीचं खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर राजकारण तापलंय. या हत्याप्रकरणाशी वाल्मिक कराडचा संबध असल्याचा थेट आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय. तर वाल्मिक कराडचा कुणाशी संबंध आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी दिले. दरम्यान, तपासात दूध का दूध आणि पानी का पानी होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सहा आठवड्यांचा अपेक्षित असलेला हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्याचा-

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन परंपरेने विदर्भात पार पडते. मात्र, विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचे अपेक्षित असलेले हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्यात पुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे वैदर्भीय आमदारांमध्ये नाराजी आणि निराशेची भावना आहे. गेले अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी कमी होत दोन ते तीन आठवड्यापर्यंत मर्यादित होता. यंदा मात्र नुकतच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवडाचा हिवाळी अधिवेशन नागपुरात झालाय. त्यामुळे विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनात अपेक्षित वाव मिळू शकलेलं नसल्याचं मत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील मुख्यमंत्री असताना पुढच्या वेळी हिवाळी अधिवेशन जास्त कालावधीचा होईल अशी अपेक्षा ही आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.. यंदा प्रश्नोत्तरांचा तास तसेच लक्षवेधी सूचनाची संधी नसल्यामुळे अनेक आमदारांना खास करून नवीन आमदारांना या अधिवेशनात बोलण्याची संधीही मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कोणी कोणी मंत्रिपदाची शपथ घेतली, संपूर्ण यादी-

कॅबिनेटमंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखेपाटील
3. ⁠हसन मुश्रीफ
4. ⁠चंद्रकांत पाटील
5. ⁠गिरीश महाजन
6. ⁠गुलाबराव पाटील
7. ⁠गणेश नाईक
8. ⁠दादा भुसे
9. ⁠संजय राठोड
10. ⁠धनंजय मुंडे
11. ⁠मंगलप्रभात लोढा
12. ⁠उदय सामंत
13. ⁠जयकुमार रावळ
14. ⁠पंकजा मुंडे
15. ⁠अतुल सावे
16. ⁠अशोक उईके
17. ⁠शंभूराज देसाई
18. ⁠आशिष शेलार
19. ⁠दत्ता भरणे
20. ⁠आदिती तटकरे
21. ⁠शिवेंद्रसिंह भोसले
22. ⁠माणिकराव कोकाटे
23. ⁠जयकुमार गोरे
24. ⁠नरहरी झिरवळ
25. ⁠संजय सावकारे
26. ⁠संजय शिरसाठ
27. ⁠प्रताप सरनाईक
28. ⁠भरत गोगावले
29. ⁠मकरंद पाटील
30. ⁠नितेश राणे
31. ⁠आकाश फुंडकर
32. ⁠बाबासाहेब पाटील
33. ⁠प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री

1. माधुरी मिसाळ
2. ⁠आशिष जयस्वाल
3. ⁠पंकज भोयर
4. ⁠मेघना बोर्डीकर साकोरे
5. ⁠इंद्रनील नाईक
6. योगेश कदम



संबंधित बातमी:

मराठी On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद…

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.