80 आणि 90च्या दशकातले सुपरहिरो गोविंदा (Govinda) हे आज 61 वर्षांचे झाले आहेत. गोविंदा हे आपल्या टायमिंग आणि विनोदी शैलीसाठी ओळखले जातात. गोविंदा यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आजवर गोविंदा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. गोविंदा हे अभिनयासोबतच त्यांच्या डान्ससाठी देखील ओखळले जातात. लग्जरी कार
मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा यांची (Govinda Net Worth) 150 कोटींहून अधिक आहे. जगभरात गोविंदा हे 'हिरो नंबर 1' या नावाने ओळखला जातो. गोविंदा यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. तसेच बंगले देखील आहेत. अभिनयासोबतच गोविंदा हे ब्रँड आणि रिअल इस्टेटमधून पैसा कमावतात. गोविंदा हे अंदाजे 2 कोटी रुपये कमावतात. त्याच्याकडे मित्सुबिशी लान्सर, फोर्ड एंडेव्हर या लग्जरी कार आहेत. ते एक ग्जरी लाइफस्टाइल जगत आहेत.
गोविंदा यांचा मंबईत मड आयलंडमध्ये आलिशान बंगला आहे. तसेच त्यांचा अमेरिका आणि कोलकाता येथे देखील बंगला आहे. राहत असलेल्या बंगल्याचे नाव जल दर्शन आहे. तसेच गोविंदा यांचे दोन फार्महाऊस देखील आहेत. गोविंदा यांना राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. गोविंदाचे चित्रपट आजही मोठ्या उत्साहाने पाहिले जातात.
गोविंदा यांचा 'कुली नंबर 1' चित्रपट खूप गाजला होता. गोविंदा हे अनेक डान्स शोचे देखील परीक्षक राहिले आहेत. गोविंदा यांनी 1987मध्ये सुनीता आहुजा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी टीना आहुजा. गोविंदा यांना पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.