लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचे नाव समोर, अटक वॉरंट जारी
Marathi December 21, 2024 05:24 PM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. उथप्पावर ईपीएफओ म्हणजेच (Employees’ Provident Fund Organisation) भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. भारताच्या माजी फलंदाजावर जवळपास 24 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप लागला आहे.

वृत्त अहवालानुसार, सेंचुरी लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापन करताना उथप्पाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून ₹ 23 लाख रुपये कापल्याचा आरोप आहे. परंतु तो त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला नाही. त्यामुळे रॉबिन उथप्पा विरोधात  टक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

पीएफ प्रादेशिक आयुक्त षडाक्षरी गोपाल रेड्डी यांच्यामार्फत उथप्पाला वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यांनी कर्नाटकातील पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र उथप्पा त्याच्या पुलकेशीनगर येथील निवासस्थानी न आढळल्याने 4 डिसेंबर रोजी अंमलात आणलेले वॉरंट परत करण्यात आले. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उथप्पा त्याच्या कुटुंबासह दुबईत राहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी उथप्पाच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेलीनाही. आता या प्रकरणी उथप्पा काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राॅबिन उथप्पा भारताकडून मर्यादित सामन्यांचे क्रिकेट खेळले आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. उथप्पाने वनडेच्या 42 डावात 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या. या दरम्यान त्याने 6 अर्धशतके झळकावली. ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 86 धावा होती. याशिवाय, आंतरराष्ट्रीय टी20 च्या 12 डावात त्याने 24.90 च्या सरासरीने आणि 118.00 च्या स्ट्राईक रेटने 249 धावा केल्या. या दरम्यान त्याने 1 अर्धशतक झळकावले. उथप्पा 2006 ते 2015 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने एप्रिल 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा-

“मी दिवसभर त्याच्यासोबत होतो, पण…”, अश्विनच्या निवृत्तीवर जडेजाचे आश्चर्यकारक वक्तव्य!
विराट कोहली, रोहित शर्मापासून आर अश्विनपर्यंत, हे 12 भारतीय 2024 मध्ये निवृत्त, पाहा संपूर्ण यादी
IND VS AUS; ‘मोहम्मद सिराज’ला वगळून रोहित-गंभीरने मोठी चूक करू नये, कारण ….

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.