R Ashwin and Ravindra Jadeja Friendship: भारतीय क्रिकेटचा एका काळ गाजवणारी अष्टपैलूंची जोडी म्हणजे रविंद्र जडेजा आणि आर अश्विन. दोघे गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये तोडीस तोड होते. या जोडीने जगभरातील सर्वच फलंदाजांना व गोलंदाजांना वेटीस धरले होते. दोघांच्या पार्टनरशीपने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले.
अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग (५०१ विकेट्स) यांच्या जोडीनंतर अश्विन व जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्सची भागिदारी केली आहे. दोघांनी ५८ कसोटी सामने एकत्र खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी ५८७ विकेट्स घेतले आहेत.
आपल्या साथीदाराने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रविंद्र जडेजाला धक्काच बसला. पत्रकारांशी बोलताना जडेजा म्हणाला, " पत्रकार परिषदेच्या ५ मिनिटे आधी मला त्याच्या निवृत्तीबद्दल समजले. हे माझ्यासाठी धक्कादायत होते, कारण आम्ही दोघे संपुर्ण दिवस सोबत होतो, पण त्याने निवृत्तीबद्दल संकतेही देली नाहीत. मला हे शेवटच्या क्षणी समजले."
दोघांच्या मैत्रीबद्दल सांगताना 'अश्विन माझा ऑन फिल्ड मेंटॉर होता' असा जडेजाने त्याचा उल्लेख केला. जडेजा म्हणाला, तो माझा मैदानावरील मार्गदर्शक आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र खेळत आहोत. आम्ही सामन्याच्या परिस्थिनुसार, आपल्याला काय करायला हवे याबाबत एकमेकांसोबत चर्चा करायचो."
"मी हे सगळं मिस करतोय. अशा बाळगतो की अपल्याला अश्विनपेक्षा चांगला ऑल राऊंडर मिळेल. पण त्याची जागा कोणीच घेऊ शतक नाही. आपल्याला पुढे जायला हवे. असे नाही की कोणाचीच रिप्लेसमेंट मिळू शतक नाही. भारताकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ही युवा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे." जडेजा पुढे म्हणाला.