Australian media trying to stir an unnecessary controversy: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन कसोटीचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेल्याने ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय निसटला, अशी ऑस्ट्रेलियन मीडियाची धारणा आहे. त्यामुळे चवताळलेल्या ऑसी मीडियाने भारतीय खेळाडूंना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. Border Gavaskar Trophy ला सुरुवात होण्यापूर्वी याच मीडियाच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर विराट कोहलीचे फोटो झळकले होते आणि त्यांनी हिंदीत मथळा दिला होता. आता हिच मीडिया भारतीय खेळाडूंबाबत मुद्दाम वाद घालताना दिसत आहे. भारताच्या आजच्या सराव सत्रानंतरही हेच घडले...
ब्रिस्बेनवरून मेलबर्नला दाखल झालेल्या विराट कोहलीसोबत ऑस्ट्रेलियान मीडियाच्या एका प्रतिनिधिने वाद घातल्याचे वृत्त पसरवले गेले होते. विराटने मेलबर्न विमानतळावर ऑस्ट्रेलियान महिला पत्रकारासोबत वाद घालल्याचे वृत्त दिले गेले. प्रत्यक्षात विराटने ऑसी मीडियाला त्याच्या मुला-मुलीचे फोटो काढू नका,अशी विनंती केली होती. पण, तरीही त्यांनी ते न ऐकल्याने विराट भडकला होता. आज ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने रवींद्र जडेजाबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. सराव सत्रानंतर रवींद्र जडेजा पत्रकारांशी संवाद साधायला आला होता, तेव्हा ऑसी मीडियाने त्याच्यावर आरोप केले.
भारत-ऑस्ट्रेलिया चौथा सामना मेलबर्नवर होणार आहे. या बॉक्सिंग डे कसोटीसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात होलसेल बदलही केले आहेत. सलामीवीर मॅकस्विनीच्या जागी १९ वर्षांच्या सॅम कोन्स्टासला पदार्पणाची संधी दिली गेली आहे. जोश हेझलवूडने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सीन एबॉट व झाय रिचर्डसन यांचा समावेश केला गेला आहे. तेच दुसरीकडे आर अश्विनच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने त्याची रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही. अशा वेळी रवींद्र जडेजावर या कसोटीत सर्वाधिक जबाबदारी असणार आहे. गॅबातही जड्डूने दमदार कामगिरी करून दाखवली होती.
आज काय घडलं...रवींद्र जडेजा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होता, पण त्याने हिंदीतून उत्तर दिल्याने ऑस्ट्रेलियन पत्रकार भडकले. त्याच्यासोबत गैरवर्तवणूक करू लागले. पत्रकार परिषदेत जडेजाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला. पण, Channel 7 ने जड्डूवर इंग्लिशमध्ये उत्तर देत नसल्याचे आरोप केले. संघ व्यवस्थापनाने आम्हाला पत्रकार परिषदेत बोलवले होते, असे ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचे म्हणणे होते. पण, त्यांना भारतीय पत्रकारांनंतर उत्तर दिली जाईल, असे अपेक्षित होते. त्यामुळे जड्डूने आधी हिंदीत उत्तरं दिली. पण, ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचे वागणे पाहून जड्डूने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
कसोटी मालिका कव्हर करण्यासाठी गेलेल्या भारतीय पत्रकारांनी जडेजाच्या वागण्याचा बचाव केला. हर्षित राणा हिंदीत बोलला तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. खेळाडूला त्याच्या भाषेत व्यक्त होण्यास काहीच हरकत नाही, ऑसी मीडियाने हिंदीचे इंग्रजीत भाषांतर करून घ्यावे, असे भारतीय पत्रकारांचे म्हणणे आहे.