सकाळी उठल्यानंतर अनेकवेळा तुमच्या चेहऱ्यावर सूज दिसून येते. चेहऱ्यावरील सूज पाहून अनेक लोकं घाबरतात. परंतु असं होत असल्यास काळजी करण्याचे काही कारण नाही. तुमच्या चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी एक नैसर्गिक आणि रामबाण उपाय तुम्ही करू शकता. चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी किंवा दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी तुम्ही फेशियल योगा करू शकता. फेशियल यग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सूज कमी होऊन जॉलाईन टोन दिसते.फेशियल योगा तुमच्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. नियमित फेशियल योगा केल्यामुळे तुमचा चेहरा अनखी चमकदार होतो.
फेशियल योगामुळे तुमच्या चहऱ्यावरील स्नायू बळकट होतात आणि चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. चेहऱ्यावर योग्य प्रमाणात रक्तप्रवाह झाल्यामुळे पिंपल्स आणि मुरुम सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. फेशियल योगा केल्यामुळे चेहऱ्यावरी सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते आणि त्वचा घट्ट होते. फेशियल योगा केल्यामुळे चेहऱ्याला एक छान टोनिंग मिळते त्यासोबतच चेहऱ्यावररी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
या कारणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर सूज येते
अनेकांना प्रश्न पडतो की सकाळी उठल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर सूज का येते? चला जाणून घेऊया चेहऱ्यावर सूज येण्याचे नेमकं काय कारण आहेत? पुरेशी झोप न लागल्यामुळे तुमच्या शरिरात पाणी साठू लागते त्यामुळे चेहऱ्यावरील सूज वाढते. जास्त प्रमाणात मीठ अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन केल्यावर देखील चेहऱ्यावर सूज येऊ शकते. जास्त प्रमाणात कामाचा ताण आणि टेंशनमुळे देखील चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
फेशियल योगा करण्याचे फायदे
फेशियल योगा केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर फेशियल योगा केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते, त्यासोबतच त्वचेला योग्य प्रमाणात रक्तप्रवाह मिळतं आणि पिंपल्स सारख्या समस्या दूर होतात. फेशियल योगामुळे शरिरातील ताण कमी होण्यास मदत होते.
फेशियल योगाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी दरोरज सकाळी १० मिनिटे करा. फेशियल करण्याच्या सुरुवातीला सोप्या आसनांनी सुरुवात करा आणि हळूहळू अवघड आसनांकडे वळा. फेशियल योगा करताना आरामदायी स्थितीमध्ये बसा यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रित करता येतं. फेशियल योगा करण्या पूर्वी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे देखील तुुमचे आरोग्य आणि तुमच्या चेहऱ्याचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.