Lalit Modi: भारत सोडलेला ललित मोदी सध्या कुठे आहे? स्वत:च ट्विट करत सांगितलं शहराचं नाव
esakal December 21, 2024 11:45 PM

ललित मोदी १३ वर्षांपूर्वी देश सोडून पळून गेला होता. तो एक मोठा उद्योगपती आहे. त्याला सध्या भारतात फरारी घोषित करण्यात आले आहे. अशा स्थितीत ललित मोदी काय करतात आणि कमाई कशी करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्यांदाच आयपीएल लीग सुरू करणारा ललित मोदी करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. आता त्याचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर आता त्याची चर्चा होत आहे. यात तो नक्की सध्या कुठे आहे याचे संकेत लावले जात आहेत.

भारतातील हा मोठा उद्योगपती परदेशात पलायन करूनही आलिशान जीवन जगत असून वर्षाला करोडोंची कमाई करत आहे. याशिवाय लंडनमध्ये ब्रिटीश सरकार ज्या रस्त्यावर आहे, त्याच रस्त्यावर त्याचे एक भव्य घर देखील आहे. तो त्याचे जीवन अगदी मौजेत घालवत आहे. ललित मोदीने आता एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. यात तो एका पबमध्ये डान्स करताना दिसत आहे.

ललित मोदी हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तो सध्या सर्बियामध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, बेलग्रेड, सर्बियामध्ये हिंदी संगीतावर नाचत खूप छान रात्र काढली... अशी पोस्ट त्यानं शेअर केली आहे. यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

https://www.esakal.com/desh/parcel-explosion-at-youth-house-due-to-dispute-in-sabarmati-ahmedabad-vru98ललित मोदी दिल्लीतील एका मोठ्या बिझनेस क्लास कुटुंबातील आहेत. ललित मोदींच्या कुटुंबाचे विस्तृत व्यावसायिक साम्राज्य आहे, ज्यात मद्य, सिगारेट आणि पान मसाला यांचे प्रसिद्ध ब्रँड आणि रिटेल स्टोअर्स, रेस्टॉरंट चेन आणि ट्रॅव्हल कंपन्या यांचा समावेश आहे. फरार असूनही मोदी हे त्यांच्या वडिलांच्या कंपनी मोदी एंटरप्रायझेसचे प्रमुख आहेत. भारताव्यतिरिक्त, मोदी एंटरप्रायझेसचा व्यवसाय मध्य पूर्व, पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत विस्तारला आहे.

मोदी एंटरप्रायझेसची एकूण संपत्ती 12 हजार कोटी रुपये आहे. वृत्तानुसार 2021 मध्ये मोदींच्या कंपनीची उलाढाल 1750 कोटी रुपये होती. ललित मोदीचे मासिक उत्पन्न सुमारे 16.5 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ललित मोदींकडे 15 कोटी रुपयांच्या तीन फेरारी आहेत. मोदींकडे खासगी विमानही आहे. लंडनमध्ये घरासारखा आलिशान पॅलेस आहे. लंडनमधील त्यांचा बंगला 7000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. ललितच्या बंगल्यात 8 बेडरूम आहेत. या बंगल्यासाठी ललित महिन्याला 20 लाख रुपये भाडे देतो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.