कणकवलीत ९ जानेवापासून पर्यटन महोत्सवाचे आयोजन
esakal December 21, 2024 11:45 PM

कणकवलीत ९ जानेवापासून
पर्यटन महोत्सवाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, कॅबिनेट मंत्री नीतेश राणे, कुडाळचे आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षे कणकवली पर्यटन महोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही ९ ते १२ जानेवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अल्पावधीतच या महोत्सवाने कणकवलीकरांचे मन जिंकले आहे. या महोत्सवात अनेक नामांकित कलाकारांनी रसिकांची दाद मिळविली आहे. यंदाही नवीन वर्षाच्या सुरुवातीला ९ ते १२ जानेवारी या कालावधीत कणकवलीत पर्यटन महोत्सव रंगणार असून, १० जानेवारीला कणकवलीतील कलाकारांसाठी दिवस राखीव ठेवला आहे. याविषयीची बैठक कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी आयोजकांसोबत अनेक स्थानिक कलाकार उपस्थित होते. कणकवली शहरातील आणि तालुक्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात नृत्य, गायन, वादन, विनोदी स्किट यासारख्या कलाप्रकारांचा समावेश असतो. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी सुहास वरुणकर, हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर यांच्याशी संपर्क साधावा. केवळ २५ डिसेंबरपर्यंत येणाऱ्या नावांचा कार्यक्रमासाठी विचार करण्यात येईल, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.