नागपूर : ‘‘राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. कशीबशी मंत्र्यांची नावे जाहीर झाली. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाही. या सर्व घटनांना एक महिना झाला आहे. सहा दिवस अधिवेशनात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकार चालवू शकतात हे कळले,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लगावला. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना ते म्हणाले, की ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या टॅगलाईने सरकारने प्रचार केला.
मात्र, २०१४ ते आतापर्यंत भाजप आणि महायुतीने जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली. ती पूर्ण केलेली नाहीत. या आश्वासनांची पूर्तता होईल याकडे सरकारने लक्ष देण्याचा सल्ला पाटील यांनी दिला.