कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे हेलीकॉप्टर ने राजापुर येथे आगमन.
भाजप कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांचे घोषणाबाजीत केले जल्लोषात स्वागत
नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने रवाना
जिल्ह्याची सीमा असलेल्या खारेपाटण येथे नितेश राणेंचे होणार मोठ्या धुमधडाक्यात स्वागत
जेसीबीच्या सहाय्याने होणार पुष्पवृष्ठी
अजित पवार यांच्या विरोधात ओबीसी संघटना आणि ग्रामस्थ आक्रमक;रस्त्यावर येऊन केली जोरदार घोषणाबाजीनुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे राज्यभरात ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आज जालनाच्या बदनापूर मधील डावरगाव येथे सकल ओबीसी समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली.
खातेवाटप झाल्यानंतर लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी येतात. हा त्यांचा खाजगी दौरा असून देवदर्शनासाठी ते गावी येत असल्याची माहिती मिळते आहे. दुपार नंतर ते दरेगावी पोहोचतील त्यानंतर त्यांचा गावी मुक्काम असेल. Maharashtra Live Update: अडीच वर्षांनंतर मंत्रिपदासाठी अजित पवार नांदेडचा विचार करतील- प्रताप पाटील चिखलीकरमंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील झाले आहे.परंतु नांदेड जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाले नाही.यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Maharashtra Live Update: दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणामपुण्यातील दाट धुक्यामुळे २२ विमानांना उशिराने उड्डाण घ्यावे लागले आहेत
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी पडलेल्या दाट धुक्याचा सकाळी सहा ते दुपारी १२ दरम्यान २२ विमानांना याचा फटका बसला आहे
एवढंच नाही तर पुण्यात येणारे एक विमान दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले
धुक्यामुळे अर्ध्या तासापासून ते तीन तासांपर्यंत विमानांच्या उड्डाणाला उशीर झाल्याचे दिसून आले.
दिल्लीनंतर बेंगळुरू, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चेन्नई, बँकॉक या शहरांसाठी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला.
Maharashtra Live Update: विठ्ठलपूजेचे ऑनलाईन बुकिंग 1 जानेवारीपासूनसावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यासाठी येत्या 1 जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी आॅनलाईन बुकिंग सुरु केले जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावरच आॅनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. भाविकांना आता घर बसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे.